The Samrudhi Highway will be completed by June 2021 
नागपूर

समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होणार याबद्दल मोपलवार म्हणाले...

नरेंद्र चोरे

नागपूर : लॉकडाउनमुळे महामार्गाच्या बांधकामावर अंशत: परिणाम झाला. मात्र, त्यानंतरही कामाची गती कमी झाली नाही. नागपूर जिल्ह्यातील शिवमडका या गावापासून सुरू होणारा समृद्‌धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमधून जातो. 24 मार्चला लॉकडाउन लागल्यानंतर कामावरील बहुतांश परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतले.

त्यामुळे मार्च ते जून या चार महिन्यांत कामावर थोडाफार परिणाम जाणवला. शिवाय लॉकडाउन काळात आंतरराज्य बससेवा बंद राहिल्यामुळे सिमेंट, लोखंड व स्टील पुरवठाही होऊ शकला नाही. मात्र, अनलॉक झाल्यानंतर बरेच मजूर मोठ्या संख्येने कामावर परतू लागल्याने कामाला पुन्हा गती आली आहे. सद्यस्थितीत 14 हजार मजूर काम करीत आहेत, असे मोपलवार म्हणाले.

विदर्भातील बांधकामाच्या प्रगतीविषयी बोलताना ते म्हणाले, नागपूरमध्ये समृद्धी महामार्गावर फ्लाय ओव्हर, छोटेमोठे पूल, भुयारी मार्ग अशा एकूण 111 संरचनांचा समावेश आहेत. आतापर्यंत 63 संरचनांची पूर्तता झाली असून 35 ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत. इगतपुरी ते नागपूर दरम्यानच्या महामार्गाचे काम एकूण आठ टप्प्यांमध्ये होणार असून, सध्या पाचव्या टप्प्याचे काम सुरू आहे.

महामार्गासाठी जमीन अधिग्रहणही पूर्ण झाले आहे. मात्र, टाऊनशिप विकासावर थोडाफार फरक पडल्याचे ते म्हणाले. महामार्गालगत विदर्भात 10 तर एकूण 20 ठिकाणी नवनगरांची उभारणी करण्यात येणार आहे. याप्रसंगी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आणि डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. 

पाच लाखांना रोजगार 
समृद्धी महामार्गामुळे नजिकच्या काळात प्रत्यक्ष पाच लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे मोपलवार यांनी सांगितले. ज्या लाभार्थ्यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली आहे अशा 23 हजार लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला असल्याचे ते म्हणाले. या मुलांना महामार्गालगत उभारल्या जाणाऱ्या नवनगरांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. 

40 टक्‍के काम पूर्ण

समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू असून, नागपूर विभागात आतापर्यंत 40 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. महामार्ग जून 2021 पर्यंत बांधून तयार होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांनी बुधवारी "व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'च्या माध्यामातून पत्रकारांना दिली. 

(संपादन : प्रशांत राॅय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT