seven district in Vidarbha received low rain
seven district in Vidarbha received low rain  
नागपूर

पड रं पाण्या, पड रं पाण्या कर पाणी-पाणी, शेत माझं लई तान्हेलं.....निम्मा विदर्भ तहानलेलाच

नरेंद्र चोरे

नागपूर : मॉन्सूनचे आगमन झाल्यापासून नियमित पाऊस सुरू असला तरी, अजूनही निम्मा विदर्भ तहानलेलाच आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी तब्बल सात जिल्ह्यांनी अद्याप सरासरी गाठलेली नाही. 

प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जूनला मॉन्सून दाखल झाल्यानंतर जून महिन्यात फारसा पाऊस पडला नाही. मात्र जुलैमध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने बऱ्याच प्रमाणात तुट भरुन निघाली. त्याऊपरही सात जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप सरासरी गाठली नाही.

सर्वाधिक चिंताजनक स्थिती गोंदिया जिल्ह्याची आहे. येथे सरासरीच्या 42 टक्‍के कमी पाऊस कमी झालेला आहे. याशिवाय अकोला, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांचीही स्थिती नाजूक आहे. सरासरी पावसात वाशीम व बुलडाणाने मात्र बाजी मारली आहे. येथे प्रत्येकी 23 टक्‍के अधिक पावसाची नोंद करण्यात आली.

नागपूर जिल्ह्यानेही सरासरी गाठली आहे. नागपूर विभागात आतापर्यंत सरासरीच्या (437 मिलिमीटर)आठ टक्‍के कमी पाऊस पडलेला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाचे दोन महिने शिल्लक असल्याने पावसाची तुट भरुन निघण्याची शक्‍यता आहे. 

विदर्भातील आतापर्यंतचा पाऊस (मिमी) 
जिल्हा---सरासरी---पाऊस प्रत्यक्ष---पाऊस तुट 
नागपूर---434 मिमी---443 मिमी--- (+2)
वर्धा---409 मिमी---404 मिमी--- (-1) 
अमरावती---383 मिमी---364 मिमी--- (-5) 
भंडारा---521 मिमी---447 मिमी--- (-14) 
गोंदिया---558 मिमी---324 मिमी--- (-42)
अकोला---330 मिमी---260 मिमी--- (-22) 
वाशीम---379 मिमी---468 मिमी--- (+23) 
बुलडाणा---302 मिमी---370 मिमी--- (+23) 
यवतमाळ---390 मिमी---315 मिमी--- (-19) 
चंद्रपूर---493 मिमी---503 मिमी--- (+2) 
गडचिरोली---580 मिमी---461 मिमी--- (-21)

(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT