नागपूर

सुपरचे ‘हार्ट फेल’ झाल्याने गरिबांचे हृदय धोक्यात!

केवल जीवनतारे

नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ह्रदयरोग (Heart disease) विभाग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभाग गरीब रुग्णांसाठी वरदान (Varadana) ठरत आहेत. दुसरीकडे सुपर स्पेशालिटीमधील कॅथलॅब यंत्र वारंवार बंद पडते. यामुळे गरीब हृदय विकाराच्या रुग्णांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला जातो. अवघ्या चार महिन्यात दुसऱ्यांदा सुपरचे हार्ट फेल झाले. गरीब रुग्णांच्या ह्रदयावर होणाऱ्या सर्व एन्जिओग्राफीपासून (Angiography) तर ऍन्जिओप्लॉस्टीच्या (Angioplasty) प्रक्रिया थांबल्या आहेत.

सुपर स्पेशाटिलीमध्ये कॅथलॅब, फॅब्रोस्कॅनसह ९९ प्रकारच्या यंत्रसामुग्री आहेत. यंत्राची वॉरंटी संपल्यानंतर त्याच्या देखभालीसाठी दरवर्षी दीड कोटी रुपयांचा निधी लागतो. यासाठी सीएनसी, एएनसी करावी लागते. मात्र विदर्भातील शासकीय रुग्णालयांतील यंत्रांच्या देखभालीचा निधी राज्य शासनाकडून मिळत नाही. कंपनीशी एएनसी आणि सीएनसीचा करार असूनही पैसे न दिल्याने करार संपुष्टात येतो. यामुळे कॅथलॅब किंवा इतर यंत्र बंद पडल्यानंतर कंपनीकडून यंत्र दुरुस्तीसाठी अडवणूक होते.

१५ दिवसांपासून कॅथलॅब बंद आहे. कॅथलॅबच्या डिस्प्लेमधील एक पार्ट निकामी झाला आहे, तो पार्ट मागवला आहे, परंतु पंधरा दिवसांनंतरही कंपनीकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे गरिबांना अधिकच फटका बसण्याची भीती आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि उत्तरांचल अशा पाच राज्यांतून आलेले रुग्ण आल्यापावली परतत आहेत. आतापर्यंत २०० हून अधिक रुग्णांच्या एन्जिओग्राफी होऊ शकल्या नाही. तर ५० जणांच्या एन्जिओप्लास्टी होणे बाकी आहे.

...तर जबाबदारी कुणाची?

सुपरमध्ये १९९८ पासून आजतागायत तब्बल ४० हजारांवर गरीब रुग्णांच्या ह्रदयावर ऍन्जिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टी झाली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून सुपर स्पेशालिटीच्या ह्रदयरोग विभागात ४ कोटी ८० लाख रुपये खर्चून नवीन कॅथलॅब लावली. एफपीडी, एफएफआर, आयव्हीयुएससारख्या गुणात्मक बदलातून सुपरचा हृदय विभाग ठणठणीत झाला. इमर्जन्सी ऍन्जिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टीचे फायदे गरीब रुग्णांना होत आहेत. मात्र १५ दिवसांपासून कॅथलॅब बंद आहे. याचा फटका गरिबांना बसतो. ऍन्जिओप्लॉस्टीअभावी गरीब रुग्णाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

आकडे बोलतात

  • कॅथलॅब बंदचा परिणाम

  • १५ दिवसांत २०० रुग्णांवर एन्जिओग्राफी झाली नाही

  • १५ दिवसांत ५० एन्जिओप्लास्टीच्या प्रक्रिया झाल्या नाही

  • सुपरचे आर्थिक नुकसान

  • एन्जिओग्राफी - ५ लाख रुपये

  • एन्जिओप्लास्टी -५० लाख रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

SCROLL FOR NEXT