Three killed in Road Accident at Nagpur Three killed in Road Accident at Nagpur
नागपूर

भीषण अपघातात अख्ख कुटुंब ठार; कारचा टायर फुटल्याने घडला अनर्थ

सकाळ डिजिटल टीम

कोंढाळी (जि. नागपूर) : भरधाव कारचा समोरचा टायर फुटल्याने महिला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर वाहन रस्ता दुभाजकावरून दुसरीकडे उलटले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर कारचालक महिला गंभीर जखमी आहे. ही घटना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महार्गावरील कोंढाळीनजीक निर्मल सूतगिरणीच्या समोर शनिवारी (ता. १२) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. (Three killed in Nagpur road mishap)

प्राप्त माहितीनुसार, अनुपम विनोद गुप्ता (वय ५५), रेणुका अनुपम गुप्ता (वय ५०) आणि अक्षद अनुपम गुप्ता (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. तर अर्चना संदीप अग्रवाल (वय ५७) असे गंभीर जखमी चालक महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वच जबलपूर येथील रहिवासी असल्याचे समजते.

अकोला येथून जबलपूरकडे जाणाऱ्या (एमपी २०-सीएच ३०४१) एक्ससेन्ट कारचा समोरील टायर फुटल्याने महिला कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन निर्मल सूतगिरणीसमोरील दुभाजकावर आदळून चार-पाच वेळा पलटून दुसऱ्या बाजूला फेकले (Terrible accident in Kondhali) गेले. त्यामुळे गाडीत मागे बसलेले पती, पत्नी व समोर बसलेला मुलगा जागीच गतप्राण झाले. तर महिला चालक गंभीर आहे. महिला चालक अर्चना अग्रवाल या अनुपम गुप्ता यांची मोठी बहीण आहेत.

अपघात एवढा भीषण होता की, मृतदेहांचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी (Road Accident) सांगितले. गुप्ता कुटुंबीय अकोला येथून नागपूर मार्गाने जबलपूरला निघाले होते. गाडीचा समोरचा चाक फुटल्याने महिला कारचालक अर्चना यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्ता दुभाजकावर आदळून कोलांटउड्या घेत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली. यातच तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

माहिती मिळताच कोंढाळीचे ठाणेदार चंद्रकांत काळे, राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पांडे, एपीआय शरद मेश्राम, पीएसआय गणेश भोयर, सुनील बन्सोड, मंगेश धारपुरे, रवी बांबल, सुखदेव धुळधुळे, कमलेश गटमे, लक्ष्मण बन्ने, रूपेश राऊत, बाळू मोरे, अमोल सोमकुंवर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमीला तातडीने नागपूरला हलविले.

महिला चालकावर गुन्हा

त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी काटोल येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. काटोल पोलिस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव यांनी घटनास्थळी भेट (Police) दिली. कोंढाळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून महिला चालकावर गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : मीरा भाईंदर: थायलंड-म्यानमार सायबर रॅकेटचा पर्दाफाश

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT