"They 'played with blood, not friends' color; 
नागपूर

जेवण केल्यानंतर घरासमोर गप्पागोष्टी करीत असताना झाला मोठ्याने आवाज, पाहतात तर काय...

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि.नागपूर)  :  धुळवळीच्या दिवशी नरखेड तालुक्‍यातील मोवाड येथे एका खुनाच्या घटनेने या सणाला गालबोट लावले. घराशेजारीच राहणाऱ्या मित्रांमित्रात क्षुल्लक कारणावरून मंगळवारी (ता.10) दुपारी वाद झाला व त्याचा वचपा मित्राने रात्री मित्राचा खून करून काढला.

क्षुल्लक वादातून काढला वचपा
मृताचे नाव अजहर मन्नान शेख (वय23, वॉर्ड क्रमांक 16)असून आरोपीचे नाव नाजीम नईम शेख (वय 23) व फईम शेख (वय 45,सर्व रा. वॉर्ड क्रमांक 16) आहे. नरखेड तालुक्‍यातील मोवाड येथील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये मन्नान शेख यांचे घर आहे. त्यांना चार मुले असून अजहर मन्नान शेख हा तिसऱ्या क्रमांकाचा त्यांचा मुलगा आहे. अजहर शेख हा खासगी वाहन चालविण्याचा व्यवसाय करीत होता. त्यांच्या घरासमोर त्यांचा मित्र नाजीम नईम शेख यांचे घर आहे.

मंगळवारी (ता.10) दुपारी दोन वाजेदरम्यान अजहर व आरोपी नाजीम यांच्यात मोवाड येथील बसस्थानकावर असलेल्या फईम शेख यांच्या दुचाकी दुरुस्तीच्या दुकानात वादविवाद झाला. याचवेळी नाजीम शेख याने अजहर याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी अजहर याचा भाऊ मजहर हादेखील बसस्थानकावरच उपस्थित होता. वाद झाल्यानंतर अजहर हा तेथून निघून गेला. पण, रात्री दहा वाजता अजहर हा घरून जेवण करून पुन्हा घराबाहेर गेला. तेव्हा अजहर यांचे भाऊ मजहर, मातीन व चुलत पुतण्या इजाज शेख हे अजहरच्या घराबाहेर जेवण करून गप्पागोष्टी करीत उभे होते.

अजहर काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना काही वेळात ओरडण्याचा आवाज आला. यामुळे मजहर, मातीन व इजाज शेख हे आवाजाच्या दिशेने धावले व पहिले असता नाजीम शेख हा बैलबंडीच्या लाकडी उभारीने अजहर याला मारीत होता. तर त्याच्या सोबत असलेल्या त्याचा काका फईम शेखदेखील अजहरला लाथाबुक्‍क्‍यांनी मारत होता. तेव्हा अजहरचे भाऊ मजहर, मातीन व इजाज शेख हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला. पण अजहर हा बेशुद्ध अवस्थेत पडून होता. या सर्वांनी त्याला शासकीय दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्‍टर यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

आरोपींना एका दिवसासाठी पोलिस कोठडी
यानंतर मृताचा भाऊ मजहर मन्नान शेख यांच्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या दोन्ही आरोपी नाजीम शेख व फईम शेख यांना पहाटे चार वाजता अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची एका दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गावळे, पोलिस हवालदार शैलेश डोंगरदिवे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Kalmadi: सबसे बडा खिलाडी! सुरेश कलमाडींच्या एका डावाने विलासरावांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कशी गेली?

माेठा निर्णय! पोषण आहाराची दैनंदिन उपस्थिती पोर्टलवर भरणे बंधनकारक; अन्यथा कारवाई, काय आहे शिक्षण विभागाचा आदेश?

Stock Market Today : शेअर बाजार 'लाल' रंगात उघडला; अमेरिकन टॅरिफचा दबाव, मात्र तिमाही निकालांमुळे 'हे' शेअर्स तेजीत

Shikhar Dhawan Wedding: गब्बर पुन्हा लग्नबंधनात अडकणार; कोण आहे, त्याची होणारी नवरी, Sophie Shine?

Gold Jewellery Insurance : सोने खरेदीवर मिळतो एक वर्षाचा विमा, चोरी झाली, घरात आग लागली तरी ज्वेलर देतो पैसे; तुम्हाला माहित्येय का?

SCROLL FOR NEXT