three people demand money to officer in nagpur
three people demand money to officer in nagpur  
नागपूर

त्या तिघांनी थांबवली अधिकाऱ्याची कार.. अन सुरु झाला प्रकार ‘बॅंड बाजा बारात’..नक्की काय घडले.. वाचा 

अनिल कांबळे

नागपूर :  शहरातील एका ‘बॅंड बाजा बारात’ टोळीने एका औषध उत्पादक कंपनीच्या विक्री अधिकाऱ्याला जाळ्यात ओढले. त्याला शारीरिक संबंध प्रस्थापीत करण्याचे आमिष दाखवले. कारमध्ये तरूणीला पाठवले. लगेच तीन युवकांनी कारचा घेराव केला. त्या अधिकाऱ्याचे कपडे काढून फोटो काढले. अधिकाऱ्याला तरूणीसह टोळीने दीड लाखाने लुटले. ४५ वर्षीय संजीव कुमार रा. कोराडी (बदललेले नाव) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी संजीव कुमार हे कारने एमआयडीसीत जात होते. रायसोनी अभियांत्रिकी कॉलेजजवळ तीन युवकांनी त्यांना थांबविले. तिघेही कारमध्ये बसले. चाकूचा धाक दाखवून त्यांना आशीर्वाद वसतिगृहाजवळ नेले. त्यांना मारहाण करून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. लुटारुंनी त्यांच्या पर्समधून तीन हजारांची रोख व एटीएम कार्ड काढले. कार्डद्वारे एटीएममधून ९० हजार रुपये काढले. 

त्यानंतर लुटारुंनी संजीव कुमार यांना तब्बल चार तास कारमध्येच डांबून ठेवले. त्यांनी अपघात झाल्याचे सांगून मित्राकडून ५० हजार रुपये आणण्यास संजीव कुमार यांना सांगण्यात आले. संजीव कुमार यांनी मित्राला फोन केला. मित्राने ५० हजार रुपये जमविले. मित्राने संजीव कुमार यांना फोन केला.संजीव कुमार याने मित्राला मंगलमूर्ती चौकात बोलाविले.संजीव कुमार यांचा मित्र मंगलमूर्ती चौकात आला. संजीव कुमार यांना कारचा क्रमांक सांगितला. 

तरुणीही सामील 

त्यानंतर कारजवळ श्वेता नावाची तरुणी आली. तिने मित्राकडून ५० हजार रुपये घेतले व पसार झाली. ५० हजार रुपये मिळताच लुटारुंनी संजीव कुमार यांना कारसह सोडले. संजीव कुमार प्रचंड घाबरले. दुसऱ्या दिवशी त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी लुटारुंचा शोध सुरू केला. उशीरा रात्री एका लुटारुला ताब्यात घेतले. तरुणी व अन्य दोघांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

शहरात अनेक टोळ्या सक्रीय

मोठमोठ्या कंपनीतील अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणी जाळ्यात ओढतात. शारीरिक संबधाची तयारी दर्शवतात. अधिकारी जाळ्यात अडकल्यानंतर शिताफिने त्याला बदनामीची धमकी देऊन लुटतात.


संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT