Tigers are also at risk of lampirog 
नागपूर

काय सांगता? वाघांनाही लंपी आचाराचा धोका; ते कसे वाचाच

राजेश रामपूरकर

नागपूर : कोरोनाशी लढता लढता मानव घायकुतीला आला आहे. या रोगावर अद्यापही लसीचा शोध न लागल्याने जगात आतापर्यंत जवळपास नऊ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मनुष्य कोरोनाशी लढा देत आहे तर पाळीव प्राणी लंपी या संसर्गजन्य आजाराने त्रस्त झाले आहे. पाळीव प्राण्यांच्या माध्यामातून हिंस्त्र पशुंनाही हा आजार होण्याचा धोका असल्याने वन विभागाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गोचीड, गोमाशी किंवा आजारी जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांना लंपी या त्वचारोगाने घेरले आहे. हा आजार गायी, म्हशी, शेळ्यामध्ये दिसून येत असला तरी गायींमध्ये याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे.

रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने यामध्ये याचा संसर्ग जाणवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जंगलाशेजारील गावातील जनावरे जंगलात चराईसाठी जातात. या जनावरांची वाघ, बिबट, कोल्हे, रानकुत्रे हे शिकार करतात. यातूनही त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे का? याबद्दल वनाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने त्याच्या माध्यमातून या आजाराचा शिरकाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होऊ नये म्हणून सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जंगलाशेजारील, बफर आणि जंगलातील गावांमधील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने हे काम युद्धपातळीवर या भागात सुरू आहे. या आजाराची नोंद अद्यापही वन्यप्राण्यांमध्ये झाली नसली तरी सर्वस्तरावर काळजी घेतली जात आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.

आजारी जनावरांना विलगीकरणात ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. या जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने लसीकरण केले जात आहे. त्याचबरोबर जनावरांच्या रक्ताच्या नमुन्याचेही तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आमच्याकडे अशा प्रकारच्या आजाराची नोंद नसल्याचे सांगितले.

जनावरांवरही लसीकरण
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, कोळसा या दोन गावांमधील पाळीव जनावरांना लंपी आजाराचे लसीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागाकडून जंगलाशेजारील गावांमधील जनावरांवरही लसीकरण केले जात आहे. त्याचा प्रसार वन्यप्राण्यांना होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. इतर प्रकल्पाकडून याबद्दल कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्याची माहिती आल्यानंतर त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातील.
- नितीन काकोडकर,
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

SCROLL FOR NEXT