Tukaram mundhe is in confusion about applying lockdown in Nagpur  
नागपूर

विश्वास बसेल का? तडफदार निर्णय घेणारे तुकाराम मुंढेच संभ्रमात.. नक्की काय आहे कारण..वाचा सविस्तर  

राजेश चरपे

नागपूर: पालकमंत्री तसेच महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या कोरोना संबंधी बैठकीत मुंढे यांनी लॉकडाउनचा आग्रह धरला होता. पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत मुंढे वगळता सर्वांनीच लॉकडाउनला विरोध केला होता. लॉकडाउन लाऊ नये याकरिता महापौर जोशी यांनी दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याला जनतेने उत्‍स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यानंतरही मुंढे केव्हाही लॉकडाउन करतील अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन जबरदस्तीने लॉकडाउन लावल्यास आपण रस्त्यावर उतरू असा इशारा दिला होता.

सातत्याने लॉकडाउनचे समर्थन करणारे आणि त्यासंदर्भात नागरिकांना खबरदारीचे इशारे देणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे स्वतःच आता लॉकडाउन लावायचा की नाही याबाबत संभ्रमात पडले आहेत. लॉकडाउनपेक्षा जीवनशैली आणि सवयी बदलल्या तरच कोरोनावर मात करता येईल, असे मत त्यांनी गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले.

लॉकडाउन लावल्याने काय फायदा होणार

सध्या शहरात कोरोना रुग्णांची आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंढे यांना पन्हा लॉकडाउन लावणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी लॉकडाउन लावल्याने काय फायदा होणार असा उलट सवाल केला. लॉकडाउन तोडणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. त्याची बातमी तुम्हीच करणार. शेवटी लॉकडाउनचे यश, अपयश नागरिकांवर अवलंबून आहे. त्यांच्या सहर्कायाशिवाय काही यशस्वी होऊ शकत नाही. याचा अर्थ लॉकडाउन लावणार नाही असा काढायचा का? असे विचारले असता मी असे म्हटले नाही, तुम्हीच चुकीचा अर्थ काढत आहात असेही मुंढे म्हणाले.

असेल तर १४ दिवसच

मी लॉकडाउन लावल्यास ते १४ दिवसांचेच असेल. त्यात एकही दिवस कमी जास्त होणार नाही. त्याची सूचना चार दिवस आधीच नागरिकांना दिली जाईल, असे ठोस उत्तरही मुंढे यांनी दिले. लॉकडाउन हा प्रशासनासाठी नाही तर जनतेसाठी आहे. तोंडाला मास्क लावला नाही, जीवनशैली बदलली नाही, नियम पाळले नाही तर लॉकडाउन करूनही प्रश्न सुटणार नाहीत, असेही ते म्हणाले.

प्रसिद्धीचे आरोप खोडले

मला प्रसिद्धची खूप हौस आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियावर सातत्याने झळकत असतो असा आरोप केला जातो. मात्र यात काही तथ्य नाही. सर्व फुटेज तपासून बघा. कोविडशिवाय दुसऱ्या कुठल्याच विषयावर आजवर बोललो नाही. जे काही बोललो ते कोरोना आणि  स्वच्छतेविषयीच, असे सांगून त्यांना विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT