Video by Tukaram Mundhe is being discussed
Video by Tukaram Mundhe is being discussed 
नागपूर

तुकाराम मुंढे यांचा तो व्हिडिओ होतोय चांगलाच व्हायरल, काय आहे यात?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आयुक्‍त तुकाराम मुंढे त्यांच्या नावाला साजेसे काम नागपुरात करीत आहेत. आल्याआल्याच त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते. मुंढे यांना साधारणतः आठवडाभरापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्‍टर व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांनी सगळ्यांना चांगलेच झापले होते. त्या गोष्टीला आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. तरीही त्यांचा "तो' व्हिडिओ अजूनही राज्यभर चांगलाच व्हायरल होत आहे. 

चांगल्यात चांगल्या आरोग्य सेवेसाठी मी बजेट केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी तुम्हा लोकांना करायची आहे. तीनशे ते पाचशे खाटांच रुग्णालय शहरात तयार करायच आहे. ती जबाबदारी माझी आहे. तुमची जबाबदारी आहे की, शहरातल्या जवळपास तीस लाख लोकांना 58 केंद्रांतून चांगल्यात चांगल्या आरोग्य सेवा देणे. दरवर्षीच्या अधिवेशनात मेयो (इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय रुग्णालय), मेडिकल आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे बोट दाखवतो. व्हेंटीलेटर आणि सर्व सुविधा तिकडे. मग आपण इथं करतो काय, असा प्रश्‍न करीत तुकाराम मुंढे यांनी डॉक्‍टरांना चांगलेच खडसावले. 

इन्फ्रास्ट्रक्‍टर काय पाहिजे ते मी उपलब्ध करून देणार आहे. आरोग्य सेवा देताना हयगय खपवून घेतली जाणार नाही. कोण कसं राजकारण करतो. याची बित्तंबातमी माझ्याकडे येते. मला काही माहीत नाही, असे चुकूनही समजू नका आणि सध्या सुरू असलेले राजकारण कृपया बंद करा. तुम्हाला कुठलंही काम असेल, तुमची काही गरज असेल तल मला सांगा. परंतु, कामात कुठलीही तडजोड मी खपवून घेणार नाही. सध्या आपल केवळ 25 टक्के कार्यक्षमतेने काम करतोय. ही क्षमता आपल्याला शंभर टक्‍क्‍यांपर्यंत न्यायची आहे. कोरोनाशी लढासुद्धा आपल्याला यशस्वी करायचा आहे. त्यानंतर येथील मुळ कामाला आपण सुरुवात करणार आहोत, असेही आयुक्तांनी अधिकारी व डॉक्‍टरांना सांगितले. 

आपल संभाषण पदाधिकाऱ्यांपर्यंत जातेच कस?

आपली पदाधिकाऱ्यांना आपल्याला दुखवायचे नाही. परंतु, कुणा हस्तक्षेपही आपण खपवून घेणार नाही. तुमच्या आणि माझ्यामधल संभाषण पदाधिकाऱ्यांपर्यंत जातेच कसं, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. मी येथे मजाक करायला आलेलो नाही आणि मजाक मला आवडतही नाही, असे त्यांनी सुनावले. आपण लोक डॉक्‍टर आहात आणि लोकांनी म्हटले पाहिजे की खरच डॉक्‍टर असा असावा, येवढे चांगले परिणाम आपल्याला द्यायचे आहेत. तुम्ही काम फक्त प्रामाणीकपणे करा, अपयश आलं तर मी घेईन जबाबदारी आणि यश आले तर तुम्हीच घ्या. ज्युनिअर, सिनिअर हे प्रकार आता बंद करा आणि एक टीम म्हणून काम करा, असा सल्लाही तुकाराम मुंढे यांनी डॉक्‍टरांना दिला.

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हिडिओत तुकाराम मुंढे डॉक्‍टरांना उद्देशून म्हणत आहेत, आपल्या आरोग्य विभागात कुठलीही शिस्त नाही. ज्याला आपण नागपुरातील सर्वात चांगल हॉस्पिटल म्हणतो, ते मी पाहून आलो. उकीरडा आहे, नुस्त उकीरडा. आजवरच्या कारकीर्दीत मी असे रुग्णालय बघितलेले नाही. आपल्याकडे शहरात 58 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ते पुरेसे आहेत. त्यामुळे नागरिकांना चांगल्यात चांगल्या आरोग्य सुविधा देणे आपले कर्तव्य आहे. परंतु, येथे केवळ राजकारण सुरू असते. त्याला तिकडे का टाकल, अन्‌ मला इकडे का आणल. यातच डॉक्‍टरांचा वेळ खर्ची जाताना दिसत आहे. सकाळी नऊ वाजता येणे आणी वेळ संपवून दुपारी दोन वाजता घरी जाणे आणि आपली वैयक्तिक दुकाने चालविणे, असेच प्रकार डॉक्‍टरांकडून सुरू आहेत. आतापर्यंत झालं ते झालं, पण यापुढे हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. 

व्हिडिओ होतोय व्हायरल

कठोर शिस्तप्रिय म्हणून ओळखले जाणारे महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना साधारणतः आठवडाभरापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्‍टर व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांनी सगळ्यांना चांगलेच झापले होते. त्या गोष्टीला आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. तरीही त्यांचा "तो' व्हिडिओ अजूनही राज्यभर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून शहरातील पालिकेची आरोग्य व्यवस्था सुधारूनच ते दम घेतील, असे दिसतय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT