नागपूर

Washim: वाशिम जिल्हावासीयांना नववर्षाची भेट! 'या' प्रकल्पाच्या कामाला सुरुवात, गडकरींनी घेतला पुढाकार

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून वाशीम लॉजिस्टिक पार्क विकास कामाला चालना मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

Washim Logistic Park Nitin Gadkari: केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून वाशीम लॉजिस्टिक पार्क विकास कामाला चालना मिळाली. दि. २९ सप्टेंबरला वाशीम येथील जाहीर सभेत बोलल्याप्रमाणे तत्काळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योग मंत्री उदय सामंत त्यांना पत्र देऊन याबाबत अवगत केले होते. यावर तत्परतेने कार्यवाही करीत मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी लॉजिस्टिक पार्कचे फलक रोवण्यात आले.

आकांक्षीत वाशीम जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाकरिता लॉजिस्टिक पार्क हा मैलाचा दगड ठरणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रका द्वारे आकांक्षीत वाशीम जिल्हा व्हिजन डॉक्युमेंट्स करणारे, जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी केली आहे. मार्च २०१८ ला एम. आय. डी. सी. ने वाशीम रेल्वे स्थानक तथा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ व १६१ ई लगत लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी ५० एकर जमिनीचे अधिग्रहण केले होते.

दि. २८ सप्टेंबर रोजी ना. नितीन गडकरी यांना नागपूर येथे भेटून सचिन कुळकर्णी व गोविंदप्रसाद यांनी पत्राद्वारे लॉजिस्टिक पार्क तात्काळ विकास करण्यासंदर्भात विनंती केली होती. लागली दुसऱ्या दिवशी दि.२९ सप्टेंबरला जाहीर सभेत ना. गडकरी यांनी वाशीम लॉजिस्टिक पार्क निर्माण करणार असल्याची घोषित केले. सतत तीन महिन्यापासून त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या हेतूने पाठपुरावा सुरू होता.

यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होऊन आकांक्षीत जिल्ह्याची मागासलेपण दूर होण्यास मदत होईल. प्रत्यक्ष चार ते पाच हजार रोजगार गतिमान उपलब्ध होईल. वाशिम जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहती यामुळे क्रियाशील होऊन मोठ्या उद्योगांना चालना मिळेल. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे.(Latest Marathi News)

गडकरी बोलले म्हणजे काम फत्ते : कुळकर्णी
नितीनजी जेव्हा एखादा विषय जाहीर बोलतात तेव्हा ते काम हमखासपणे होतेच. त्यांची वाशीम जिल्हा विकासाबाबत तळमळ अद्भूत आहे. हा केवळ लॉजिस्टिक पार्क नसून मल्टी लॉजिस्टिक पार्क होणार आहे. येत्या दोन वर्षात वाशीम नगरी उद्योग नगरी म्हणून सुद्धा समोर येऊ शकते. यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत व जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी विशेष सहकार्य केले असे मत सचिन कुळकर्णी यांनी व्यक्त केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT