जलालखेडा (जि.नागपूर):: राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असले, तरी शासनाचे आदेश हवेतच विरले आहेत. शासकीय कापूस खरेदीत दिवसागणिक येणाऱ्या अडचणींमुळे पावसाळा सुरू झाला, तरी शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरीच पडून आहे. नरखेड तालुक्यात अद्यापही निम्म्या शेतकऱ्यांचा हेही वाचा : बॅंकवाले म्हणाले, स्वॉरी ! तो मॅसेज जुना होता !कर्ज देणार नाही, कारण काय तर हे.
कापूस खरेदी होणे बाकी आहे.
राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक-सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पणन संचालकांचे कार्यालय, वखार महामंडळाची कार्यालये शनिवारी, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत एफएक्यू दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी शासनाची घोषणा असली तरी मात्र नरखेड तालुक्यातील 2,500 शेतकऱ्यांचा जवळपास 70 हजार क्विंटल कापूस शेतकऱ्यांचा घरीच पडून आहे.
शेतीची कामे करावीत की खरेदी केंद्रात दिवस घाललावा
आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे पैशासाठी हाल सुरू आहेत. दुसरीकडे त्याचे नुकसान होत आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे कापसात ओलावा वाढत असल्यामुळे त्याला त्याच्या कापसाला भाव कमी मिळत आहे. त्याच्या गाड्या दोन-दोन दिवस पावसात विक्रीसाठी उभ्या राहत आहेत. त्याला आता शेतीची कामे करावीत की खरेदी केंद्रात दिवस घालावा, हा प्रश्न आहे. तसेच आता त्याच्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
65 हजार क्विंटलचीच खरेदी
शेतकऱ्यांकडील शिल्लक कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात व शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कापूसखरेदी पूर्ण करण्यात येईल. असे शासनाने जाहीर केले. त्यासाठीचे नियोजन कोलमडल्यामुळे नरखेड तालुक्यात खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या जिनिंग फॅक्टरीमध्ये जागाच शिल्लक नसल्यामुळे आठवड्यातील फक्त चार ते पाच दिवसच कापसाची खरेदी होत आहे. कापूस खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरीत जागा उपलब्ध होण्यासाठी जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत सध्या असलेले कॉटन सीड्स व बेल्सचा उठाव मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला नाही. जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत असलेल्या कॉटन सीड्सचा लिलाव तातडीने करण्याचे तसेच सीड्स उचलण्यासाठी असलेला 15 दिवसांचा कालावधी दहा दिवसांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलाव झाल्यानंतर जिनिंग फॅक्टरीतून सिड्सची उचल विहित वेळेत न केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण, वस्तुस्थिती मात्र या विपरीत आहे. यामुळेच आतापर्यंत नरखेड तालुक्यात जरी तीन ठिकाणी कापसाची खरेदी सुरू असली तरी मात्र फक्त 65 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे, तर 70 हजार क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे.
राज्यात 23लाख 83 क्विंटल कापसाची खरेदी शिल्लक
राज्यात 2019-20 मध्ये उत्पादित एकूण 410 लाख क्विंटल कापसापैकी केंद्रीय कापूस महामंडळ आणि त्यांच्या वतीने कापूस पणन महासंघाने आतापर्यंत 17 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खासगी व्यापाऱ्यांनी सुमारे 198 लाख क्विंटल कापूस खरेदी केल्याने राज्यात एकूण 386 लाख 17 हजार क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. 23 लाख 83 हजार क्विंटल कापसाची खरेदी शिल्लक असून एफएक्यू दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले असले, तरी मात्र अद्यापही नरखेड तालुक्याचाच विचार केला, तर निम्म्यापेक्षा जास्त कापूस शेतकऱ्यांचा खरेदी करण्यात आला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
उर्वरित शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवावी
सन 2017-18 मध्ये तूर व हरभरा खरेदी होऊ शकल्यामुळे त्यावेळी शासनाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्यास परवागी देऊन भावांतराचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले होते. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांनादेखील त्याचा कापूस विकण्यास परवानगी देऊन कापसावर भावांतर योजना राबवून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सरळ लाभ द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही व त्याच्या हातात खासगीत कापूस विकल्यास खरीप हंगामासाठी निधीदेखील येईल, अशी मागणी ज्यांचा कापूस घरी आहे, अशा शेतकऱ्यांनी केली आहे.
सर्व शेतक-यांचा कापूस खरेदी होईल !
शेतकऱ्यांचा सर्वच कापूस खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. त्याप्रमाणे नियोजनसुद्धा करण्यात आले आहे. पण, काही खरेदी केंद्रावर जागा उपलब्ध नसल्यामुळे व पाऊस सुरू झाल्यामुळे यात अडचणी येत आहे. यावर कशी मात करता येईल. यासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. लॉकडाउनमध्ये कापूस खरेदी झाली नाही व जेव्हा सुरू झाली तेव्हा शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी करण्यात आली. तरी मात्र नरखेड तालुक्यात सर्वांत जास्त कापूस खरेदी करण्यात आला.-सतीश येवले,
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नरखेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.