Without intensive care, poor patients will be deprived of treatment Nagpur medical collage news 
नागपूर

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘अतिदक्षता‘ कागदावरच; गरीब रुग्ण राहणार उपचारापासून वंचित

केवल जीवनतारे

नागपूर : पहिल्याच टप्प्यात राबवण्यात येणारा सुपरच्या सात विभागांत पाच खाटांचा अतिदक्षता विभागाचा प्रस्ताव बारगळला आहे. एकूण ३५ खाटांचा अतिदक्षता विभाग आता तयार होणार नाही. यामुळे रुग्णांना अतिदक्षता विभागातील उपचारापासून वंचित राहावे लागेल.

गरिबांच्या हृदय, किडनी, पोटासह मेंदूविकारांवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील उपचार वरदान ठरत आहेत. ही बाब लक्षात घेत राज्य शासनाने २०१७ मध्ये आगामी ५ वर्षांत १०० कोटींच्या निधीतून आधुनिकीकरणाची घोषणा केली होती. परंतु ती घोषणा पोकळ ठरली आहे. सुपर स्पेशालिटीत दर दिवसाला पाचशेपेक्षा अधिक रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते.

तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात बीपीएलग्रस्तांसाठी उभारलेले किडनी प्रत्यारोपण केंद्र वरदान ठरले आहे. आतापर्यंत सुमारे ६६ किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात. ही बाब लक्षात घेता सुपरच्या विकासासाठी सरकारने १०० कोटींची घोषणा करण्यात आली होती. यातील ३४ कोटींचा निधी उपकरणांवर खर्च करण्यात येणार होता.

अतिदक्षता विभागात ३० व्हेंटिलेटर, ३५ मॉनिटर खरेदीची निविदा प्रकाशित झाली होती. याचा लाभ गरीब रुग्णांना मिळणार होता. मात्र, हा प्रस्ताव बारगळला असल्यामुळे आता या लाभापासून रुग्ण वंचित राहणार आहेत. मेडिकलमध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. सुपरच्या श्रेणीवर्धनाला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी त्रिशरण सहारे यांनी केली आहे.

‘एमआरआय’च्या प्रतीक्षेत

मेडिकलमध्ये एमआरआय बंद पडले आहे. रुग्णांची होत असलेली परवड बघता ‘सुपर’ स्पेशालिटीसाठी स्वतंत्र एमआरआय यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १८ कोटींची स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, आता मेडिकल आणि मेयोतील दोन्ही एमआरआय कधी येतील याची प्रतीक्षा प्रशासनाला आहे. 

फडणवीस सरकारने केलेल्या घोषणा फसव्या
फडणवीस सरकारने केलेल्या घोषणा फसव्या ठरल्या आहेत. विद्यमान सरकारने मात्र त्या पूर्ण कराव्यात. यामुळे सुपरमध्ये गरिबांना अत्याधुनिक उपचार मिळतील.
- त्रिशरण सहारे,
अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटना, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT