navratra celebration will be online in amba and ekvira mata temple amravati  
विदर्भ

यंदा अंबा अन् एकवीरा मातेचे ऑनलाइन दर्शन, नवरात्रोत्सवाचे होणार थेट प्रक्षेपण

सुधीर भारती

अमरावती : सर्वत्र आकर्षक रोषणाई, रांगोळ्यांनी सजविलेला गाभारा, भाविकांच्या झुंडी, चिमुकल्यांचा खेळण्यांसाठीचा हट्ट, असे चित्र अंबादेवी व एकवीरा देवी परिसरात दरवर्षी नवरात्रोत्सवात पाहायला मिळते. मात्र, यंदा हे चित्र अमरावतीकरांना अनुभवता येणार नाही. कोरोनामुळे यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. विदर्भाचे आराद्य दैवत असलेल्या अंबादेवी व एकवीरादेवीचे ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे. तसेच काही स्थानिक वाहिन्यांकडून थेट प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे. 

कोरोनामुळे विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर 19 मार्चपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. कोरोनाची परिस्थिती अद्यापही कायम असून 17 ते 24 ऑक्‍टोबरदरम्यान होणाऱ्या नवरात्रोत्सवावर कोरोनाची गडद छाया पसरली आहे. विशेष म्हणजे भाविकांच्या जिव्हाळ्याचे धार्मिक कार्यक्रम म्हणजेच भजन, कीर्तन, प्रवचने तसेच महाप्रसादसुद्धा यंदा होणार नाही. विशेष बाब म्हणजे संत अच्युत महाराजांनी मागील 40 वर्षांपासून सुरू केलेली प्रवचनमाला त्यांच्या देहत्यागानंतरसुद्धा त्यांचे परमशिष्य सचिन देवमहाराज पुढे चालवित आहेत. यंदादेखील ही प्रवचनमाला फेसबुक लाइव्ह तसेच थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

येत्या 17 ऑक्‍टोबरला पहाटे मुहूर्तावर पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना केली जाणार आहे. नऊ दिवस कुठलेही धार्मिक उपक्रम मंदिरात होणार नाहीत. विशेष म्हणजे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली गांधी चौकातील जत्रादेखील यंदा राहणार नाही. मागील सहा महिन्यांपासून लाखो भाविक अंबा व एकवीरा देवीच्या दर्शनापासून वंचित राहणार असल्याची खंत विश्‍वस्त मंडळाने व्यक्त केली आहे. 

शासनाकडून अद्याप कुठलेही आदेश प्राप्त झालेले नाही. नवरात्रोत्सवात यंदा भाविकांना दर्शनास परवानगी राहणार नाही. अंबादेवीच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्याचा निर्णय विश्‍वस्त मंडळाकडून घेण्यात आला आहे. 
-रवींद्र कर्वे, सचिव अंबादेवी संस्थान
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: बाळापूर नगरपरिषद निवडणूक निकाल, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी यश

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT