अमरावती : लाकडाऊन सुरू झाल्यापासून अमरावती शहरातील सर्व रस्ते ओस पडले आहेत. खाद्याची दुकाने, हॉटेल आणि नाश्त्याच्या गाड्या बंद असल्यामुळे रस्त्यावर वावरणाऱ्या मुक्या बेवारस प्राण्यांची दयनीय अवस्था होत होती. अशातच वसा संस्थेचे ५२ स्वयंसेवक दररोज रस्त्यावरच्या बेवारस गायी, श्वान, मांजरी, डुक्कर आणि पक्ष्यांना खाद्य पुरवीत आहे.
अमरावती शहरात अंदाजे ४००० च्या वर श्वान, २३०० च्या वर गोवंश, २००० च्या वर डुक्कर आणि १७०० च्या आसपास भटक्या मांजरी आहेत. हे सर्व प्राणी रस्त्यावर भटकून त्यांची भूक भागवत होते. मात्र लोकडाऊनमुळे या सर्व प्राण्यांचे हाल होत असल्याचे वसा संस्थेच्या लक्षात आले. त्यामुळे अमरावती येथील दान दात्यांच्या मदतीने वसा संस्थेने डॉग फूड, कॅट फूड, गवंडा, डॉग बिस्किटे, कणिक, अंडे, तांदूळ आणि ताक खरेदी केले. आणि दररोज हे खाद्य शहरात विविध भागात सकाळच्या वेळेस वितरित केले जात आहे.
रस्त्यावरील भटक्या श्वानांसाठी डॉग फूड, अंडी- भात, ताक- भात आणि डॉग बिस्किटे देण्यात येतात. तर गोवंशाला गव्हांडा, पोळ्या भरविल्या जात आहेत. मांजरींना कॅट फूड दिल्या जात आहे तर डुक्करांसाठी पोळ्या, भात पुरविला जात असल्याची माहिती वसाचे सचिव गणेश अकर्ते यांनी दिली.
सदर कामा करिता वसा संस्थेतर्फे सोशल मीडियावर मदतीची मागणी करण्यात आली आहे. या मागणीला दाद देत बंगलोर, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अकोला आणि अमरावती येथील प्राणिप्रेमींंनी ऑनलाईन आर्थिक मदत वसाला पाठविली आहे. अजूनही या कार्याकरिता नागरिक आर्थिक मदत करत आहेत.
प्रिती शाह, प्रिती नागले, अनिकेत देशमुख, खोरगडे, आशिष आणि संध्या लड्डा, अमृता बंड, प्रतीक आणि कस्मिरा सांगणी, भूषण फरतोडे, सारंगधर अकर्ते, वनमाला फुटाणे, शोभा आणि पंडितराव वानखडे, मंदा आणि प्रतापराव रेवाळकर, मृणायल लोहकरे, विद्या वाघमारे, वनिता आणि गजानन सायंके, सुशांत तंतरपाळे, भूषण आणि रुपाली वानखडे, नितीन माहोरे, प्रवीण बारांगे, पूनम वडगावकर,स्वाती निस्ताने, अक्षय पांडे, लोकेंद्र जैन, सुमित आणि धनंजय देशपांडे, भरत मेहता, शैलेंश ठाकरे, प्रिती धोपटे, मुकेश वाघमारे, भूषण सायंके, निखिल फुटाणे, आकाश वानखडे, गणेश अकर्ते, पंकज मालवे, रोहित रेवाळकर, वैष्णवी तिखिले , नितीजा हिवसे, सौदागर, छाया कावरे, शुभम कळसकर, मुकेश मालवे, निखिल पाटील, यामिनी सोनटक्के, शारदा गोल्हारे हे प्राणिप्रेमी त्यांच्या त्यांच्या घरा जवळील भटक्या प्राण्यांना खाद्य पुरवीत असल्याची माहिती वसाचे उपाध्यक्ष निखिल फुटाणे यांनी दिली.
अवश्य वाचा - लॉकडाउनमध्ये कबुतरने लावले भांडण आणि निघाले हे...
MIDC, दस्तुर नगर, चपराशी पुरा, वडाळी, पाचशे क्वाटर, विद्यापीठ, तपोवन, बियाणी चौक, राहातगाव, विद्याभराती कॉलेज परिसर, म्हाडा, कठोरा नाका, नवसारी, जुनी अमरावती परिसर, टोपे नगर, साई नगर, संकेत कॉलनी, चैतन्य कॉलनी यासह इतर परिसरात राहत असलेले स्वयंसेवी बेवारस प्राण्यांच्या जेवणाची काळजी घेत आहे..
प्राण्यांपासून माणसाला कोरोना होतो असा गैरसमज सोशल मीडियामधून पसरविण्यात आला होता त्यामुळे अनेक प्राणिप्रेमींनी रस्त्यावरील भटक्या श्वान मांजरीना खाद्य देणे बंद केले असल्याचे लक्षात येत आहे. काही लोकांनी त्यांच्या घरात अनेक वर्षापासून असलेल्या श्वानांना बेवारस सोडले असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्या भागात कार्यरत असलेले आमचे स्वयंसेवक त्या त्या श्वानाची काळजी घेत आहेत. नागरिकांनी आपले पाळीव प्राणी कोरोनाच्या भीतीमुळे रस्त्यावर सोडू नये अशी विनंती वसाचे अँनिमल्स केअर टेकर रोहित रेवाळकर यांनी केली आहे.
अमरावती शहरात हजारच्यावर भटके प्राणी आहेत. सर्वच प्राण्यांना खाऊ घालणे एकट्या संस्थेला शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासमोर उरलेले अन्न आणि भांड्यात पाणी ठेवावे. जेणे करून त्या त्या विभागातील बेवारस फिरणाऱ्या प्राण्यांना खाद्य मिळेल. आणि ते प्राणी अन्नाच्या शोधात रस्त्यावर येणार नाहीत. प्राण्यांना सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान खायला द्यावे. म्हणजे दिवसभर ते सावलीत शांत बसून राहतील. रात्री उरलेले अन्न घरा बाहेर ठेवल्यास प्राण्यांची रात्रीची भूक शमू शकते.. नागरिकांनी भीती न बाळगता मुक्या जीवांना खाऊ घालण्याची विनंती वसाचे सहाय्यक पशु वैद्यक शुभम सायंके यांनी केली आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.