file photo 
विदर्भ

बोंबला! खुल्या बाजारातील तेजीमुळे शासनाला तूर मिळणे कठीण, डाळ महागण्याची शक्यता

कृष्णा लोखंडे

अमरावती : तुरीची शासकीय नोंदणी सुरू असली; तरी खरेदी मात्र अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात बारापैकी केवळ दोन केंद्रांचा आरंभ आतापर्यंत झाला आहे. शेतकऱ्यांनी मात्र खुल्या बाजारातील तेजीमुळे त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदा शासनाला मूग, उडीद व सोयाबीनपाठोपाठ तूरही मिळण्याची शक्‍यता धूसर आहे. भविष्यात याचा परिणाम तूरडाळीचे भाव चढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली. मूग, उडीद व सोयाबीनसह कापसाला फटका बसला. शासनाने हमीदराने खरेदी करण्यासाठी नोंदणी व खरेदी सुरू केली असली; तरी मूग, उडीद व सोयाबीन शासनाला मिळू शकलेला नाही. जिल्ह्यात दर्यापूर केंद्रावर फक्त १२ क्विंटल सोयाबीन विक्री केला गेला.

पावसाने दगा दिल्याने तुरीवर असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा सध्या बऱ्यापैकी पूर्ण होत आहेत. नवीन तुरीचे बाजारात आगमन झाले असून हमीदराच्या तुलनेत भाव चढलेले आहेत. सुपर दर्जाच्या तुरीला सहा हजार ते 6 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळू लागला आहे. अमरावतीसह जिल्ह्यातील इतर बाजार समितीत असेच भाव आहेत.


शासनाने 20 जानेवारीपासून तुरीच्या शासकीय खरेदीचे आदेश काढले आहेत. बारा केंद्र त्यासाठी सुरू केले आहेत. बुधवारपर्यंत यातील तिवसा व अमरावती ही दोनच केंद्रे प्रत्यक्षात सुरू झालीत. मात्र उद्‌घाटनालाही तूर विक्रीसाठी आली नाही. जिल्ह्यात बारा शासकीय केंद्रांवर 9 हजार 215 तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

अमरावती येथील केंद्रावर 1431 व तिवसा येथील केंद्रावर 724 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी यातील एकाही शेतकऱ्याने शासकीय केंद्रावर तूर विक्रीसाठी आणलेली नाही. इतर दहा केंद्रांचा शुभारंभ अद्याप झालेला नाही.


शासनाला तूरडाळ मिळणे कठीण

शासन दरवर्षी हमीदराने सुपर दर्जाची 33 टक्के तूर विकत घेते. याचा उपयोग नंतर सार्वजनिक वितरणप्रणालीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना स्वस्त दरात डाळ विकण्यात येते. यंदा मात्र शासनाला तूर मिळण्याची शक्‍यता फार कमी आहे. खासगी खरेदीदारांनी बाजारात येणाऱ्या नवीन तुरीला हमीदराच्या तुलनेत चढे दर दिले असल्याने शेतकऱ्यांनी तूर विक्रीचा मोर्चा खासगी बाजाराकडे वळविला आहे. तीन महिन्यांपूर्वी तूरडाळ शंभर रुपयांवर गेली होती. सद्यःस्थितीत ती 89 ते 90 रुपये किलो आहे.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Latest Marathi News Update : अयोध्या राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या घरांवर पोलिसांची धाड

Humanity Story: आयुष्याच्या सायंकाळी कोसळल्या धर्माच्या भिंती! नात्यांनी साथ सोडली, मानवतेने दिला आधार, मुस्लिम महिलेने पार पाडले हिंदू अंत्यविधी..

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Satej Patil on Gokul election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार? सतेज पाटील यांनी एका वाक्यात कंडका पाडला

SCROLL FOR NEXT