corona test kit in akola.jpg 
विदर्भ

COVID19 : जूनमध्ये कोरोना बाधित ओळखण्यासाठी होणार पंचाईत; ती कशी काय?...आवश्यक वाचा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत पसरलेली आहे. तर आता पुढील जुन आणि जुलै महिन्यांत या आजाराचा उद्रेक होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोबतच हेच दोन महिने ऋतू बदलाचे असून, या दरम्यान सर्दी, ताप, खोकल्याच्या आजाराचे रुग्ण वाढीस लागतात.

तेव्हा साधा फिव्हर कोणता आणि कोरोना फिव्हर कोणता हे ओळखणे आरोग्य विभागाला कठीण जाणार आहे. असे जरी असले तरी अद्यापही आयसीएमआरने याबाबत कुठलीही गाईड लाईन्स जारी केले नसल्याने जिल्हा पातळीवर त्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही.
ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी,खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे सध्या ही लक्षणे कोरोना झाल्याची आहे.

मात्र, हीच लक्षणे नवीन ऋतू सुरु झाला की आपल्या आरोग्यात बदल होऊ लागतात. ताप, सर्दी खोकला हे तर ठरलेले आजार आहेत. तेव्हा कोणता रुग्ण हा कोरोना बाधित आहे आणि कोणता रुग्ण साध्या आजाराचा आहे हे कळणे कठीण जाणार आहे. यासाठी आरोग्य विभाग पुढील काही दिवसांत याबाब काही नियोजन करणार जरी असले तरी अद्यापही आयसीएमआरकडून याबाबत कुठलेही दिशा निर्देश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. तेव्हा वेळेवर आलेल्या गाईड लाईन्सनंतर आरोग्य विभागाची तारांबळ नक्कीच उडणार यात शंका नाही.

औषधी वाटप बंद झाला की काय ?
पावसाळ्यात साथरोग पसरू नये म्हणून म्हणून आरोग्य विभागाकडून जनजागृतीसह प्रतिबंधित उपाय म्हणून काही औषधीचे वाटप केले जाते. मागास परिसराचा सर्व्हे करून त्या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात आजार होऊ नये म्हणून औषधी दिल्या जातात. मात्र, अद्याप तरी तसे काही होताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे.

तपासणी होणार तरी कशी?
साधा सर्दी, ताप, खोकला आणि कोरोना लक्षणे असलेली लक्षणे याची तपासणी करावी लागणार आहे. तेव्हा या दोन्ही रुग्णांची सरसकट तपासणी केले जाणार आहे का? आणि तसे जर झाले तर जून आणि जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT