झरी जामणी (जी. यवतमाळ) : झरी जामणी तालुक्यातील विद्युत ग्राहक मागील चार महिन्या पासून वीजेच्या लपंडावामुळे त्रस्त होते. महावितरण झरी जामणी उप विभागाकडून ग्राहकांना वेठीस धरण्याची एकही संधी सोडली जात नसून वेळीअवेळी खंडित होणारा वीजपुरवठा, चुकीच्या पद्धतीने घेतले जाणारे रीडिंग किंवा रीडिंग न घेता मनमानी पद्धतीने पाठवण्यात येणारी बिले, यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. महावितरणच्या या नियोजनहीन कारभाराविरोधात समाज सेवक मंगेश पाचभाई व नारायण गोडे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत. सोमवार ता. २७ ला दुपारी मुकूटबन महावितरण कार्यालयावर या कारभाराचा मुर्दाबाद, मुर्दाबाद, एमएसईबी मुर्दाबाद चे नारे देत व निषेध व्यक्त करीत बस स्टँड चौक ते पाण्याच्या टाकी मार्गे महावितरण मुकूटबन कार्यालयावर महावितरणची प्रतीकात्मक निषेध अंत्ययात्रा काढत या अंत्ययात्रेत डफडे लावून 'डफली बजाओ’ आंदोलनाची हाक दिली तर भजन मंडळींनी भजन गाऊन महावितरणला जागे करण्याचा प्रयत्न केल्या गेला.
महावितरण कंपनी ग्राहकांकडून वारेमाप विज बिले वसूल करते मात्र त्या मोबादल्यात सुविधा दिली जात नाही. दिवसा व रात्री वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढीव वीज बिलाची चौकशी करण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांशी केली जाणारी अरेरावीची भाषा, महावितरणकडून नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून नियमित अचूक रीडिंग घेतले जात नाही. अंदाजे बिले पाठविली जाते. अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून महावितरण प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र महावितरणकडून या तक्रारींकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे आंदोलनात मोठ्या संख्येने जनता एकत्र आली. जनतेच्या मागण्या महावितरण अधिकाऱ्यासमोर मांडत निदर्शने केली. महावितरण उपकार्यकरी अभियंता मंगीलाल राठोड यांनी समस्त जनतेला ग्वाही दिली की मुकूटबन येथील विद्युत कार्यालयात वीज बिल दुरुस्ती करीता कर्मचारी राहील, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात येईल, तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकरीता वेळोवेळी देखभालीची कामे केली जाईल, तालुक्यातील नादुरुस्त मीटर उपलब्धलेनुसार लवकरात लवकर बदलवीले जाईल, त्याचप्रमाणे बोगस रिडींग घेऊन चुकीचे बिले पाठविणाऱ्या एजन्सीवर नियमानुसार कठोर कारवाही करण्यात येईल असे लेखी स्वरूपात देण्यात आले.
आंदोलनात सामाजीक कार्यकर्ते नारायण गोडे, लक्ष्मीबाई बच्चेवार, ज्येष्ठ नागरीक गोविंदा उरकुडे, अडेगाव सरपंच सीमाताई लालसरे, ग्रा. प. सदस्य वंदना पेटकर, संतोष पारखी, संजय आत्राम, सरपंच खातेरा विशाल ठाकरे, येडशी सरपंच विनोद धोटे, कोसारा सरपंच सचीन गोडे, जीवन उलमले, बाळू चेडे, शंकर भगत, विलास कसोटे, मंगेश चामाटे, गणेश पेटकर, राहुल ठाकूर, विजय लालसरे व तालुक्यातील विद्युत पुरवठामुळे त्रस्त झालेले नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या वेळी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या उपस्थीत पोलीस कर्मचाऱ्याचा चोख बंदोबस्त होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.