rabbi sowing area increase in yavatmal 
विदर्भ

यंदा रब्बीच्या क्षेत्रात वाढ; एक लाख हेक्टरवर पेरणी, तर दोन लाख हेक्टरचे नियोजन

चेतन देशमुख

यवतमाळ : खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला आहे. प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. त्यामुळे यंदा रब्बीचे पेरणीक्षेत्र वाढले आहे. गेल्या वर्षी एक लाख 69 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा दोन लाख हेक्‍टरवर पेरणीचा अंदाज असून, आतापर्यंत 50 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

पावसाने सुरुवातीला उघडझाप घेतली. त्यामुळे पाऊस होणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, यंदा दमदार पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जमिनीतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. पावसामुळे सोयाबीन तर काही भागात कपाशीला फटका बसला आहे. त्यामुळे खरिपातील नुकसान रब्बीत भरून काढण्याचे नियोजन शेतकऱ्यांचे आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख 32 हजार 316 हेक्‍टर आहे. गेल्या वर्षी एक लाख 69 हजार 643 हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती.

यंदा त्यात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यामध्ये मुख्य पीक असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या मोठ्या क्षेत्रावर पेरण्या होणार आहेत. अडीच हजार हेक्‍टरवर रब्बी ज्वारी, 60 हजार हेक्‍टरवर गहू, तर एक लाख 29 हजार हेक्‍टरवर हरभरा पिकाचा पेरा होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय, करडई, जवस, तीळ, सूर्यफुल, सहा हजार हेक्‍टरवर भाजीपाला व इतर पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. यासाठी बियाणे कमी पडू नये, यासाठी तजवीज करण्यात आली आहे. रब्बीसाठी एक लाख 54 हजार 600 क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 56 हजार क्विंटल सार्वजनिक, तर 98 हजार क्विंटल बियाणे खासगीकडून नियोजन केले आहे. आतापर्यंत एक लाख हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. सध्या पेरणीने वेग धरला असून, येत्या आठवड्याभरात शंभर टक्के पेरणी होण्याची शक्‍यता आहे. यंदा हरभरा क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सव्वालाख हेक्‍टरवर पेरणीचा अंदाज आहे. 

पीक प्रस्तावित पेरणी क्षेत्र
रब्बी ज्वारी 2,299
गहू 60,926
मका 1,160
हरभरा 1,29,042
करडई 73
सूर्यफुल 21
तीळ 98
इतर 6,651

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT