relatives accused that former corporator died due to police in hinganghat of wardha 
विदर्भ

पोलिसांनी धमकावल्यानेच माजी नगरसेवकाचा मृत्यू, नातेवाईंकाचा आरोप; शहराला पोलिस छावणीचे स्वरूप

दशरथ ढोकपांडे

हिंगणघाट ( जि.वर्धा ) : रात्र गस्तीवर असलेल्या ठाणेदार आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या अरेरावीमुळे येथील माजी नगरसेवक, तथा सामाजिक कार्यकर्ते हाजी मिर्झा परवेझ बेग यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी पोलिसांना धारेवर धरले. पोलिस ठाण्यासमोर एकत्र आलेल्या नागरिकांच्या जमावामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

नागरिकांनी कारवाई करण्यासाठी गेलेले ठाणेदार भानुदास पिदुरकर आणि कर्मचारी आरिफ फारुखी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, तसेच ठाणेदाराची दुसऱ्या ठाण्यात बदली करा, अशी मागणी मृताचे नातवाईक आणि शहरातील नागरिकांकडून करण्यात आली. या प्रकाराची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांना कळताच त्यांनी हिंगणघाट गाठत प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी सहकार्य केले. 

जमावाच्या मागणीपोटी पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचारी आरीफ फारूखी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, तर ठाणेदार भानुदास पिदुरकर यांची स्वतंत्र तपासणी करण्याचे आश्‍वासन दिले. याचा अहवाल लवकरच जाहीर करण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या आश्‍वासनावर आणि झालेल्या कारवाईवर वातावरण निवळल्याचे दिसले. पण ठाणेदार बदलीच्या मागणीवर काही नागरिक ठाम असल्याने काही काळ तणाव कायमच होता. यावेळी आफताब खान, राजू तिमांडे, हुमायू मिर्झा बेग, मिर्झा दौलत बेग, शाकिर खान पठाण, ज्वलंत मून यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.  

अशी घडली घटना - 
'हिंगणघाट येथील के. जी. एन. मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या माळ्यावर हाजी मिर्झा परवेझ बेग यांच्या मालकीचे हॉटेल आहे. रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हिंगणघाट पोलिस ठाण्याचे निरीक्षक भानुदास पिदुरकर आणि पोलिस शिपाई आरिफ फारुखी हे हॉटेलात गेले. त्यावेळी लोक जेवण करत होते. परवेज बेग यांचा मुलगा सादाब मिर्झा परवेझ बेग हे हॉटेलमध्ये होते. त्यांना धमकावून तू दारू  विकली म्हणून शिवीगाळ केली. शिवाय हॉटेलची झडती घेतली. सादाब मिर्झा सांगत होता की साहेब आम्ही हॉटेल मध्ये दारू  विक्री सोडा पिऊही देत नाही. पण ठाणेदार पिदुरकर आणि आरिफ फारुखी काहीच ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. ते सादाब मिर्झाशी वाद घालत राहिले होते. यावेळी सादाब मिर्झाने वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच मिर्झा परवेझ हे हॉटेल मध्ये आले. ठाणेदार पिदुरकर आणि मिर्झा परवेझ बेग यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि त्याच क्षणी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.', असे नातेवाईकांनी सांगितले.

ठाणेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी - 
हाजी मिर्झा परवेझ बेगचे कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्टांनी ठाणेदार आणि पोलिस शिपायावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तर्फे शहरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

येथील ठाणेदार भानुदास पिदुरकर आणि सहकारी कर्मचारी रात्र गस्तीवर असताना येथील हॉटेल लजिजवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी हॉटेलचे चालक हाजी मिर्झा परवेझ बेग यांच्याशी वाद झाला. या वादात हाजी मिर्झा परवेझ बेग यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडून ठाणेदारासह पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी झाली. यामुळे प्रथम चौकशीत पोलिस कर्मचारी दोषी आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर ठाणेदारांची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. 
- पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी, हिंगणघाट (प्रभारी) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT