retirement of 8 members from the standing committee in chandrapur corporation 
विदर्भ

सभापती पावडे बाद, आता कोण? मनपा स्थायी समितीतून ८ सदस्यांची निवृत्ती

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : मुदत संपलेल्या स्थायी समितीतील सदस्यांची ईश्‍वरचिठ्ठीने काढण्यात आलेल्या निवृती प्रकियेत विद्यमान सभापती राहुल पावडे यांचे नाव निघाले. तूर्तास पावडे यांना या पदावरून दूर व्हावे लागेल. त्यामुळे मागील चार वर्षांपासून या पदावर डोळा ठेवून असलेल्या भाजप नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 16 सदस्यीय या समितीतून शुक्रवारी (ता. 15) आठ सदस्यांना निवृत्ती देण्यात आली.

महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर स्थायी समितीसारख्या महत्वाच्या समितीवर राहुल पावडे यांची वर्णी लागली. त्यावेळी अनेकांनी या पदासाठी जोरदार फिल्डींग लावली होती. परंतु, तत्कालीन अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पावडे यांच्यावरच विश्‍वास टाकला. पावडे एक वर्ष राहतील, अशी अपेक्षा ठेवून या खुर्चीवर अनेकांनी डोळा ठेवला होता. मात्र, सलग चार वर्षे पावडे यांच्यावरच मुनगंटीवार यांची कृपादृष्टी राहिली. दरम्यान, अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर राखी कंचर्लावार यांची महापौरपदी वर्णी लागली. त्यावेळी पावडे यांच्याकडे उपमहापौरपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे पावडे आता स्थायी समितीचे सभापती पद सोडतील, असा कयास बांधला जात होता. परंतु, मुदत संपल्यानंतरही ते या पदावर कायम राहिले. सलग चार वर्षे हे पद भूषविणारे ते पहिले नगरसेवक ठरले आहे. 

या काळात पावडे यांची खुर्ची हिसकावून घेण्यासाठी भाजपमधील काही नगरसेवकांनी मोर्चेबांधणी केली. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. आता मुदत संपल्यानंतर स्थायी समितीतून पावडे निवृत्त झाले. त्यामुळे नवीन सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यापूर्वीसुद्धा पावडे हे या समितीतून निवृत्त झाले होते. त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली होती. यावेळीसुद्धा तोच प्रकार होईल, अशी चिंता काही नगरसेवकांना वाटत आहे. 

पावडे यांच्या सोबत स्थायी समिती सदस्य राजेंद्र अडपेवार, शीतल कुळमेथे, सकीना अन्सारी, सतीश घोनमोडे, सीमा रामेडवार, राहुल घोटेकर, शीला चव्हाण या सदस्यांना ईश्‍वरचिठ्ठीने निवृत्त व्हावे लागले. 16 सदस्यीय या समितीतून दरवर्षी आठ सदस्यांना निवृत्त व्हावे लागते. येत्या 19 तारखेला संबंधित पक्षाचे गटनेते सदस्यांची नावे देणार आहेत. भाजपकडून कुणाची नावे येतील, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. शेवटच्यावर्षी तरी सभापती पद मिळावे यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

स्वेच्छा निधीतून व्यायामशाळा -
स्थायी समितीच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक 17 मधील अशोका स्पोर्टिंग क्‍लबच्या व्यायमशाळेला स्वेच्छा निधीतून मंजुरी मिळाली. तसेच बाबुपेठ येथील स्मशानभूमीची दुरुस्ती तसेच सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव बसपचे गटनेते नगरसेवक अनिल रामटेके यांनी मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

Rohan Bopanna Retires: ग्रँड स्लॅम चॅम्पियन बोपण्णाचा टेनिसला अलविदा! २२ वर्षांच्या कारकि‍र्दीबद्दल म्हणाला...

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Kolhapur Politics : सतेज पाटील गटाला खिंडार; खंदे समर्थक अप्पी पाटील कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

Raju Shetty : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार, कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन उसदरबाबत करेक्ट कार्यक्रम करा; राजू शेटटींचा इशारा

SCROLL FOR NEXT