Sanjay Rathod, Bhavana Gawali News Sanjay Rathod, Bhavana Gawali News
विदर्भ

संजय राठोड, भावना गवळींविरोधात शिवसैनिक आक्रमक; बाळासाहेबांचा फोटो काढला

राठोड यांच्या स्वागत फलकावर लावलेला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढला

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Rathod, Bhavana Gawali News यवतमाळ : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक गेले. यात यवतमाळचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचाही समावेश होता. त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानेही वाद झाला. बंडखोर आमदारांविरुद्धचा रोष अद्याप संपलेला नाही. ते आपापल्या जिल्‍ह्यात परतत असताना वाद होत असल्याचे दिसत आहे. असाच वाद शनिवारी (ता. १३) यवतमाळमध्ये पाहायला मिळाला.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसैनिकांकडून बंडखोरांवर कठोर टीका केली जात आहे. त्यांचा प्रत्यय पुन्हा एकदा यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाला. शनिवारी संजय राठोड हे मंत्री झाल्यानंतर तसेच खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचे बंडानंतर पहिल्यांदाज जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या फलकावर असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शिवसैनिकांनी काढला. शिवसेनेने अनेक सामान्यांना सत्तेची संधी दिली. असे असतानाही शिवसेनेमुळे (Shiv sena) जे आज मोठे झाले, ते पक्षाला सोडून गेले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक प्रचंड संतापले आहे.

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात राठोड समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. बंडानंतर राठोड यांचे एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. त्यापूर्वी शिवसैनिकांनी स्थानिक दत्त चौकात मंत्री संजय राठोड यांच्या स्वागत फलकावर लावलेला शिवसेनानप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढला. बंडखोरांनी शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता निवडणूक जिंकून दाखवावी असे आव्हान राठोड यांना केले.

महिला शिवसैनिकांनी झळकावले निषेधाचे फलक

‘इडी’च्या प्रकरणात अडकल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) जिल्ह्यात येत आहे. त्यांच्या विरोधातही महिला शिवसैनिकांनी आंदोलन केले. पक्षांशी गद्दारी करून खासदार भावना गवळी येत असल्याने महिला शिवसैनिकांनी त्यांच्या निषेधाचे फलक झळकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT