The son accepted the father's body four days later 
विदर्भ

धक्कादायक! जन्मदात्या पित्याचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाला लागले चक्‍क चार दिवस; पोलिसांच्या डोळ्यांनाही फुटले पाझर

संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोना विषाणूची लागण होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वडिलांचा कोविडमुळे मृत्यू झाल्यानंतर मुलाने मृतदेह स्वीकारण्यासाठी चक्क चार दिवस लावल्याची धक्कादायक घटना शहरात उजेडात आली.

दर्यापूर तालुक्‍यातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्या कोविड रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने त्याच्या एकुलत्या एक मुलाला घटनेबाबत माहिती दिली. मृतदेह त्याच दिवशी सायंकाळी इर्विन रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. तीन दिवस होऊनसुद्धा अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेण्यासाठी मुलगा इर्विनमध्ये आलाच नाही.

इर्विनच्या पोलिसांनी माहिती देण्यासाठी वारंवार त्याच्याशी संपर्क केला. सुरुवातीच्या संभाषणानंतर मुलाने मोबाईल स्वीचऑफ करून ठेवला. इर्विन चौकीतील पोलिसांचा संपर्क सतत सुरूच होता. मुलगा येत नसल्याचे बघून मृत्यूचा मेमो कोतवाली ठाण्यात दिला गेला. चौथ्या दिवशी शुक्रवारी दुपारी पुन्हा इर्विन चौकीतील पोलिसांनी मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा त्याने फोन उचलला असता मृतदेह ताब्यात घेण्यासाठी इर्विनमध्ये येण्यास सांगितले.

कोविडमुळे मृत्यू झालेल्या पित्याचा मृतदेह स्वीकारण्याची त्याची मानसिकता दिसत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अखेरचा उपाय म्हणून पोलिसांच्या भाषेत त्याची समजूत काढली. मृतदेह न स्वीकारल्यास पोलिस बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करतील.

पित्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळविणे कठीण जाईल, यासह विविध मुद्दे सांगितल्याने अखेर तो तयार झाला. चौथ्या दिवशी सायंकाळी मुलगा अन्य काही लोकांना घेऊन इर्विनच्या शवागारासमोर आला. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह मुलाच्या स्वाधीन केला. जन्म देणाऱ्या पित्यावर त्याच्या मृत्यूनंतर असा प्रसंग ओढविल्याबद्दल पोलिसांनी देखील दु:ख व्यक्त केले.

सकारात्मक मानसिकता ठेवा
मृत्यू कुणाचाही होवो वाईटच वाटते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांची मानसिकता बदलली आहे. कोविडने मृत्यू झालेल्यांचा मृतदेह स्वीकारण्यासाठी मानवतेच्या दृष्टीने विचार करावा. सकारात्मक मानसिकता ठेवा.
- डॉ. श्‍यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

मदतीचा हात पुढे करा
प्रशासनावर प्रत्येक जबाबदारी ढकलणे योग्य नाही. कठीण परिस्थितीत मदतीचा हात पुढे करा. कोविडमुळे मृत्यू झालेल्या काहींवर नातेवाईक न आल्याने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागतात.
- डॉ. सीमा नैताम,
आरोग्य अधिकारी, महापालिका

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT