sonography centers open at sironcha primary health center in gadchiroli 
विदर्भ

खुशखबर! गडचिरोलीतील गर्भवती महिलांची पायपीट थांबणार, आता तालुक्यातच मिळणार सुविधा

मिलिंद उमरे

सिरोंचा (जि. गडचरोली ) :  सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात अखेर सोनोग्राफी यंत्र लागणार आहे. त्यामुळे गर्भवती महिला व विविध आजाराच्या रुग्णांना लाभ होणार आहे. तेलंगाणामध्ये जाणाऱ्या रुग्णांची पायपीट थांबणार आहे.

तालुक्‍याच्या मुख्यालयात असलेल्या या रुग्णालयात एकही सोनोग्राफी यंत्र नाही. वर्षाला सुमारे 200 हून अधिक बाळांचा जन्म या रुग्णालयात होतो. मात्र, गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी अहेरी किंवा तेलंगाणा येथील रुग्णालयांमध्ये पाठवले जात होते. मात्र, आता ही समस्या दूर होऊन सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा सुरू  झाली आहे. यापूर्वी गर्भवती महिलांना 100 किमी प्रवास करून सोनोग्राफीसाठी जावे लागत होते. प्रवासादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागत होता. हे तालुक्‍यातील मोठे एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात एकही सोनोग्राफी यंत्र नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. गर्भधारणेनंतर विविध टप्प्यांवर सोनोग्राफी करणे आवश्‍यक असते. गर्भामध्ये काही दोष तर नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी पाचव्या महिन्यात ऍनॉमली सोनोग्राफी आवश्‍यक असते. 

खासगी रुग्णालयात सर्वसाधारण सोनोग्राफीसाठी 500 ते 700 रुपये शुल्क आकारले जाते, तर ऍनॉमली सोनोग्राफीसाठी अडीच ते तीन हजार रुपये आकारले जातात. सरकारने ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रांची सोय न केल्याने खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन महिलांना सोनोग्राफी करून घ्यावी लागते व त्याचा अहवाल येथील डॉक्‍टरांना दाखवावा लागतो. सरकारच्या जननी सुरक्षा योजना व जननी शिशू सुरक्षा योजना या दोन्ही योजनांअंतर्गत गर्भवतींना सुमारे 700 रुपये देऊन सोनोग्राफीची तपासणी व प्रवास खर्च सरकारी रुग्णालयातून दिला जातो. कोणत्याही खासगी रुग्णालयांचे सोनोग्राफीचे दर ठरलेले नाहीत. त्यामुळे रुग्णालयातच सोनोग्राफी यंत्र असल्यास महिलांची इतर रुग्णालयांत येण्या-जाण्याची पायपीट थांबेल. आता सिरोंचा ग्रामीण रुग्णालय येथे सोनोग्राफीची सुविधा सुरू  झाली आहे. गर्भवती महिलांना ही सुविधा मोफत मिळणार असून महिलांना आर्थिक व शारीरिक त्रास दूर होणार, अशी अपेक्षा महिलावर्गातून व्यक्त केली जात आहे.

'सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध झाली असून दर मंगळवारी डॉ. शशिकांत बद्देला सोनोग्राफी करणार आहेत. तालुक्‍यातील गर्भवती महिलांनी आशा वर्कर यांच्याशी संपर्क साधून आपल्या सरकारी ग्रामीण रुग्णालयात मोफत सोनोग्राफी सुविधेचा लाभ घ्यावा.
- डॉ. अश्‍विन वलके, ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT