बुलडाणा : गरिबांचा फ्रिज म्हणून ख्याती असलेल्या मातीच्या माठावर यंदा कोरोना व्हायरचे संकट आले असून, बाजारपेठ आणि ग्राहकच उपलब्ध नसल्यामुळे कर्ज स्वरूपात घेतलेली आर्थिक रक्कम परतफेड करणार कशी अशी चिंता जिल्ह्यातील कुंभार कारागिरांना लागली आहे. दरम्यान, शासनाने असलेला माल विक्रीसाठी सूट देऊन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीने होत आहे.
यंत्र-तंत्राच्या युगात आजही ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांना क्रेझ असलेल्या माठाची विक्रीचे केंद्र म्हणून बुलडाणा शहर ओळखल्या जाते. पारंपरिक व्यवसायाचा कित्ता बिडवित तोट्याचा असलेला माठ विक्रीचा व्यवसाय आजही कुंभार समाजाच्यावतीने केला जातो. विशेष म्हणजे उन्हाळ्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घागर घेऊन त्यांची पूजा गेल्यानंतर नवीन माठामध्ये पाणी भरुन त्याचा वापर करण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात पहावयास मिळते.
महत्त्वाची बातमी - जगासह भारत नैसर्गिक संकटात, भेंडवळच्या घटमांडणीचे भाकित, मांडणीला तीनशे वर्षांची परंपरा
दिवसेंदिवस वाढणारा सिमेंटचा उपयोग आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध होणारे फ्रिज पाहता दरवर्षी माठ विक्रीच्या सरासरीमध्ये मोठी तफावत होत आहे. माठ घटविण्यासाठी मातीचीही निपुरता मोठे संकट असून, दर आणि अंतराचा अडसर असतानाही त्यावर मात करत व्यवसायासाठी जादा दर देऊन माठ घडविण्यासाठी माती आणावी लागते असे येथील व्यावसायिक सांगतात. राज्यात कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव वाढत असल्याने राज्यातील कुंभार काम, वीट व्यवसाय व मुर्तीकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आवश्यक वाचा - हेच का ते अच्छे दिन?...
मागील काही महिन्यापूर्वीच उन्हाळ्याचा हंगाम पाहता लहान- मोठे माठ, मडकी, विटा, सणांसुदीत लागणारी सुगडी, पणत्या, बोलकी व मुर्ती बनविण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण तयारी होत असते. परंतु, कोरोना विषाणू व ताळेबंदीमुळे सणांवर संपूर्ण निर्बंध आले आहे. लाखो रुपये खर्च करून बनविलेल्या मालाला व्यापारी तसेच ग्राहक मिळत नसल्यामुळे तोच तेथेच पडून आले.
कुंभार समाजावर मोठे संकट
एका दिवसावर आलेला अक्षय तृतीया आला असतानाही जेमतेम खर्चही निघालेला नाही. त्यामुळे कुंभार समाजावर मोठे संकट आले असून, उन्हाळ्याच्या हंगामावर पूर्ण वर्षाचा उदरनिर्वाह आणि व्यवसायाला लागलेला खर्चाचा ताळमेळ असतो. आगामी काळात समाजाला व्यवसाय करण्यासाठी शासनाने परवानगी देणे गरजेचे असून, शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच काळजी व सुरक्षित अंतर ठेवून व्यवसाय केल्या जाईल.
- अॅड. राजीव मंगळवेढ, जिल्हाध्यक्ष, कुंभार समाज सामाजिक संस्था, बुलडाणा.
शासनाने लक्ष देण्याची गरज
अक्षय तृतीयेचा सण कुंभार समाजासाठी मोठा सण आणि उत्पन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातून संधी असते. परंतु, यावर्षी सर्वांवर कोरोना संकट कोसळले आहे. मे महिना अद्याप लागायचा असून, आगामी ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव येत आहे. त्याअनुषंगाने समाजाने बनविलेले माठ, मडकी विकण्यासाठी व मुर्तीकारांना त्यांचा कच्चा माल, माती, शाडू माती, पिओची, रंग व इतर साहित्याची दुकाने व ट्रान्सपोर्टचा व व्यवसाय करण्याची परवानगी देऊन समाजाचे आर्थिक नुकसान टाळून त्यांची उपासमार होऊ नये यासाठी आर्थिक व इतर योग्य ती मदत करणे गरजेचे आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.