student face problem in online education in yavatmal
student face problem in online education in yavatmal 
विदर्भ

आधी अ‌ॅन्ड्रॉइड फोनसाठी कसरत अन् आता नेटवर्क मिळेना; आम्ही शिकायचं तरी कसं?

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र, नेटवर्कींगचे काष्ठशुक्‍ल शिक्षक व विद्यार्थ्यांची पाठ सोडत नाही. पाल्याकडून अ‌ॅन्ड्रॉइड मोबाइलची मागणी होत आहे. ती पूर्ण करताना पालकांची चांगलीच कसरत होत आहे.

शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गांचा जोर ऑनलाइनवरच आहे. गुगलमीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. जुलै ते सप्टेंबरपर्यंत संथगतीने सुरू असणारे वर्ग आता जोरात सुरू झाले आहे. शहरातील काही भागात नेटवर्कचा अडथळा येत नाही. मात्र, काही शहरी भागासह ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव डोकेदुखी वाढविणारा ठरत आहे. नेटवर्क असेल अशा ठिकाणी बसून ऑनलाइन वर्गाला हजेरी लावण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला आहे. विद्यार्थी नेटवर्कचा शोध घेत आहे. त्यासाठी झाड, घरावर बसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यातही अनेकांना यश आले नाही. विद्यार्थी दिलेल्या वेळात वर्गात बसतात. मात्र, त्यांना नेटवर्कअभावी शिक्षक काय शिकवत आहे, हेच कळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कोरोनामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. खासगी कंपनीत काम करणारे व्यक्ती अर्ध्यापगारावर कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. त्यातच वाढलेल्या महागाईने कंबरडे मोडले आहे. घरात एकच मोबाइल असल्याने मुलांकडून महागड्या मोबाइलची मागणी होत आहे. मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालक उसनवारी करून पाल्याची मागणी पूर्ण करीत आहेत. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका -
ऑनलाइन शिक्षणाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. शहरात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना काळात खोली, वसतिगृह सोडत आपले घर गाठले. ग्रामीण भागात वीजपुरवठ्यासोबतच नेटवर्कींगचा अडथळा पाठ सोडत नाही. आता शहरात खोलीचा येणारा खर्च करण्याची 'पत' राहिली नाही. 

महाविद्यालयाकडून दररोज गुगल मीटच्या माध्यमातून वर्ग होतात. नेटवर्क राहत नसल्याने अभ्यासात अडथळा येत आहे. कोरोनाचे संकट टळून महाविद्यालय लवकर सुरू व्हावेत, अशी अपेक्षा आहे.
-कोमल भगत, विद्यार्थिनी, यवतमाळ.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील मतदार 'विनाश'ला नव्हे तर 'विकास'ला मत देण्याइतपत हुशार आहेत; राऊतांना भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT