Superstitious remedies done on two year old child in Achalpur  
विदर्भ

हा तर अघोरीपणाचा कळस! पोटफुगीवर उपचार म्हणून चिमुकल्याच्या पोटावर गरम सळाखीचे चटके; संतापजनक प्रकार 

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटात अंधश्रद्धेतून पोटफुगीवर उपचार म्हणून एका दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम सळाखीने चटके दिल्याचा संतापजनक प्रकार पुन्हा समोर आला आहे. सदर घटना चिखलदरा तालुक्‍यातील लवादा गावात घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा आरोग्यसेवेवर अंधश्रद्धा भारी पडल्याचे दिसून आले.

मेळघाटातील जून महिन्यात दोन मुलांच्या संपूर्ण पोटावर गरम विळ्याने चटके (डंबा) देण्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे अंधश्रद्धेतून पोटफुगीवर उपचार म्हणून एका दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, त्या बालकावर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिखलदरा तालुक्‍यातील उपकेंद्र बिहाली अंतर्गत येत असलेल्या लवादा गावातील दिवेश अखंडे या दोन वर्षांच्या चिमुकल्याचे पोट दोन दिवसापुर्वी फुगले होते, त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी घरीच पोटावर चटके (डंबा) देण्यात आले. यामध्ये त्या बालकाची प्रकृती अधिकच खालावली. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य कर्मचारी तथा आशा सुपरवायझर यांनी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

मात्र उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी अमरावती येथे रेफर केले, त्यानंतर बिहाली उपकेंद्रातील आरोग्यसेविका संगीता डाखोळे यांनी तत्काळ सदर बालकाला वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अमरावती येथे उपचारासाठी दाखल केले. या बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे श्रीमती डाखोळे यांनी सांगितले. दरम्यान, त्या मुलाच्या शरिरात रक्ताची कमतरता असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची नोंद अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे.

गावोगावी समूपदेशन गरजेचे

आजारावरील उपचारासाठी आदिवासी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेला बळी पडतात. त्यामुळे त्यांचे समूपदेशन करणे आवश्‍यक आहे. येथे कुपोषणाची समस्या असल्याने आणि आदिवासींमध्ये असलेला अशिक्षितपणा यामुळे विविध आजारांवर पोटावर चटके (डंबा) देण्याची अघोरी प्रथा आहे.

वारंवार घडत आहेत घटना

काही महिन्यांपूर्वीच आजारी पडल्याने एका सव्वीस दिवसांच्या चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके देण्यात आले होते. याप्रकरणात मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबतच चटके देण्यास प्रवृत्त करणाऱ्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले. असे असतानाही मेळघाटात वारंवार अघोरी कृत्य घडत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT