third accused arrested in case of fraud with tourist in anjangaon surji of amravati 
विदर्भ

पर्यटक आर्थिक फसवणूक : तिसऱ्या आरोपीला मुंबईतून अटक, अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता

गजेंद्र मंडलिक

अंजनगावसुर्जी ( अमरावती ) : थायलंड बँकॉक  सहलीच्या नावाखाली विदर्भातील तब्बल 41 पर्यटकांची आर्थिक फसवणूक प्रकरणात मुंबई येथून एकाला अटक केली. पोलिसांनी मुख्य सूत्रधार नंदकिशोर पाटील याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. त्यामुळे याप्रकरणाची पाळेमुळे मुंबईत असल्याची माहिती मिळाली असून काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

विदेश सहलीच्या नावावर आर्थिक फसवणुकीबाबत पुसद व जरुड येथील पर्यटकांकडून तक्रार दाखल होताच येथील पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी मानवसेवा विकास फाउंडेशनचे संस्थापक नंदकिशोर पाटील व त्याचा मोठा भाऊ विनोद पाटील यांना अटक केली होती. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत त्यांच्याकडून  मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी (ता.26) पोलिस पथक मुंबई येथे रवाना झाले होते. पाटील बंधूंनी प्रवासाच्या नावाखाली पर्यटकांकडून घेतलेली रक्कम ज्या व्यक्तीच्या खात्यात टाकली होती त्या व्यक्तीला ठाणे येथील गवळीपाड्याच्या शुभम कॉम्प्लेक्‍समधून ताब्यात घेण्यात आले असून दीपक महादेव वानखडे, असे त्याचे नाव आहे. या प्रकरणातील तिघांनाही मंगळवारी (ता.27) न्यायालयात हजर केले असता नंदकिशोर याचा भाऊ विनोद याला जामीन मिळाला असून नंदकिशोर व दीपक वानखडे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांनी प्रथमदर्शनी बँकेचे व्यवहार तपासले असून त्या आधारावर याप्रकरणाचे धागेदोरे मुंबईत रुजले असल्याचे प्रथम तपासात समोर आले. आता पुन्हा तपासात विमानाच्या तिकीट बुकिंगसाठी या लोकांनी कुणाशी व्यवहार केला याची तपासणी केल्यानंतर पुन्हा ठगबाजींचे मासे गळाला लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

माहितीच्या आधारे तपासाची दिशा -
प्राथमिक तपासात अटकेतील व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे येथून एकाला अटक केली असून आता पाच दिवसांच्या पीसीआरमध्ये जी माहिती समोर येईल त्यानुसार पुढील तपास व कारवाईचे नियोजन केले जाईल, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश जावरे यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spare Parts Price: आधी सोनं-चांदी उच्चांकी, आता वाहन खर्चही गगनाला भिडला; टायर्स आणि गाड्यांच्या सुटे भागांचे दर वाढले

Horoscope : आजपासून गुप्त नवरात्र सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार; अचानक मिळतील पैसे, मिळेल मोठं सरप्राइज, इच्छापूर्ती योग

कलर्स मराठीकडून सुरज चव्हाणला 'BBM 6'चं आमंत्रण; रीलस्टार घरात जाणार? उत्तर देत म्हणाला- बोलावलंय तर...

U19 World Cup: १८ षटकार अन् २९ चौकार... दक्षिण आफ्रिकेच्या यंगिस्तानचा मोठा पराक्रम; स्पर्धेत गाठला नवा उच्चांक

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

SCROLL FOR NEXT