tibetan people not come for sweater selling due to corona in yavatmal 
विदर्भ

ग्राहकांनो, यंदा मिळणार नाही तिबेटियन स्वेटर, कोरोनाने रोखली तिबेटियन नागरिकांची वाट

सूरज पाटील

यवतमाळ :  हिवाळ्याच्या कडाक्‍याच्या थंडीत ऊब देणाऱ्या कपड्यांची गरज प्रत्येकालाच भासते. तिबेटियन नागरिकांनी थाटलेल्या स्वेटर दुकानांची ग्राहक वाट धरतात. यंदा प्रथमच कोरोनाने तिबेटियन विक्रेत्यांची वाट रोखली. त्याची उणीव ग्राहकांना भासत आहे.

सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या तिबेटवर चीनने कब्जा केला. तेथील नागरिकांचा अमानुष छळ केला. या अत्याचाराला कंटाळून तिबेटियन नागरिकांनी देशात आसरा घेतला. आपला देश एक दिवस स्वतंत्र होईल व मोकळा श्‍वास घेता येईल, ही आशा तिबेटियन नागरिकांना आहे. शांततेच्या मार्गाने भारतात राहून आंदोलनेही केली आहेत. आपला प्रदेश सोडून दुसरीकडे वास्तव्यास राहणाऱ्या तिबेटियन नागरिकांनी ऊबदार कपडे विक्रीचा व्यवसाय अनेक वर्षांपूर्वी निवडला. त्यातूनच त्यांनी उदरनिर्वाहाची समस्या निकाली काढली. राज्यासह जिल्ह्यात हिवाळ्यात येऊन स्वेटर विक्रीची दुकाने थाटायचे. मराठी माणसांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंधही निर्माण झाले. अनेक वर्षांनंतर त्यांना प्रथमच व्यवसायाच्या निमित्ताने जिल्ह्यात येता आले नाही. त्यांच्या ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. अजून म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यामुळे विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. आझाद मैदानात गेल्यास तिबेटियन नागरिकांची उणीव भासत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.

फ्रिडम तिबेटची आठवण -
ग्राहकांची लूट रोखण्यासाठी तिबेटियन विक्रेत्यांनी "फिक्‍स रेट'चा पर्याय ठेवला. त्यामुळे लूट थांबल्याने खरेदीत होणारी घासाघीस थांबली, तर दुसरीकडे दुकानाच्या ठिकाणी 'फ्रिडम तिबेट', असे बॅनर लावून आपल्या मागणीकडे लक्ष वेधायचे, ही आठवणही येत असल्याचे ग्राहक सांगतात.

लुधियानातून खरेदी -
तिबेटियन विक्रेते येणार नसल्याने या व्यवसायात स्थानिक नागरिक उतरले आहेत. त्यांनी लुधियाना येथून मालाची खरेदी केली. माल आणण्याच्या अधिक भुर्दंड बसल्याने ऊबदार कपड्याच्या भावात काही प्रमाणात वाढ करावी लागल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संपत्तीत हिस्सा देण्यास नकार, सुप्रीम कोर्टानेही वडिलांची दिली साथ; नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण’ योजना बंद नाही; काहींना लखपती करणार : मुख्यमंत्री फडणवीस

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजी महाविकास आघाडीत भूकंप! आमदार राहुल आवाडेंनी सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याला लावलं गळाला

SCROLL FOR NEXT