Two died in an accident in Yavatmal district
Two died in an accident in Yavatmal district 
विदर्भ

मुलगा घरी न आल्याने मंडळी शेतात गेले; धुऱ्यात जळालेली ती वस्तू पाहून स्तब्ध झाले, काय बोलावे काही सूचेना

रवींद्र शिंदे

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : मित्रांसह गावाशेजारी नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शेतशिवारात लावलेल्या वीजतारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी उघडीस आली. शैलेश रूपचंद राठोड (वय २७, रा. आलेगाव) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावालगत असणाऱ्या नाल्यावर आपल्या तीन मित्रांसह शनिवारी (ता. ५) शैलेश खेकडे पकडण्यासाठी गेला होता. तो घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी त्याचा शोध घेतला. आलेगाव येथील शिवारात शिवदास राऊत यांच्या शेताच्या धुऱ्याला शैलेशचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची फिर्याद कवडू राठोड (वय ३६) याने बाभूळगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार अशोक गायकी हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, पायी जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तालुक्‍यातील दिग्रस-देवनगर येथील पाण्याच्या टाकीजवळील दिग्रस-पुसद मार्गावर घडली. रवी उर्फ खंडू माणिक पडवाळ (वय ३५, रा. इसापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी पडवाळ हा दिग्रस-पुसद मार्गावरून पायी इसापूरकडे जात होता. यावेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात त्याच्या डोक्‍याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्याला तत्काळ दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्राथमिक उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनायक जाधव, नरेंद्र पुंड, राजू वरटी करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT