Vidarbha
Vidarbha esakal
विदर्भ

Vidarbha : दिग्रसचे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले श्रीराम मंदिर

ऋषिकेश हिरास

दिग्रस : येथील ब्राह्मणपुरी भागात असलेल्या श्रीराम मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. श्रीराम नवमी बरोबरच इतर अनेक सण-उत्सव या राम मंदिरात मोठ्या उत्साहात वर्षभर साजरे केले जातात. सध्या अयोध्येच्या पार्श्‍वभूमीवर या मंदिरातही गर्दी वाढली आहे.

दिग्रस येथील ब्राम्हणपुरी भागातील श्रीराम मंदिर संस्थान हे अतिशय पुरातन आहे. इसवी सन १७०० मध्ये संस्थानची स्थापना झाल्याचा इतिहास आहे. पूर्वी गावाच्या बाहेरील भव्य गढीच्या पायथ्याशी तसेच आज शहराच्या मध्यभागी दिसणारे हे मंदिर दोन मजली लाकडाचे कोरीव नक्षीमध्ये होते. मंदिराची स्थापना सद्गुरू आबासाहेब महाराज यांनी केल्याचे सांगण्यात येते. मंदिराची जागा रामभक्त कावेरी उर्फ पार्वतीबाई बाबा भट यांनी सन १९०५ मध्ये संस्थानला दान दिली. प्रल्हाद जयकृष्ण खनगई यांच्या अध्यक्षीय काळात मंदिराचा विस्तार वाढत गेला.

सन १९६२ मध्ये वामनराव महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला. साधारणत: दोन हजार चौरस फूट जागेत मंदिर व सभागृह बांधण्यात आले. अतिशय जुन्या मूर्ती भंगल्यामुळे नव्याने श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या नवीन संगमरवरी मूर्ती बसविण्यात आल्या. सभागृहातील उत्तराभिमुखी श्री गणेशाची व दक्षिणाभिमुखी श्री मारुतीची मूर्तीसुद्धा अतिशय पूर्वीपासून स्थानापन्न आहे. त्याचप्रमाणे श्रीराम मंदिराच्यावर मजल्यावर राधा-कृष्णाचे मंदिर बांधण्यात आले आहे. हे आता पुरातन काळाप्रमाणेच दुमजली राम मंदिर असून आजही सुस्थितीत आहे. शहरातील भाविक भक्तांची या मंदिरावर अमाप श्रद्धा असल्याने दररोज शेकडो भाविक आवर्जून श्रीरामाच्या दर्शनाला येत असतात.

श्रीरामनवमीला भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. श्रीराम नवमीला सकाळीच यजमानांच्या हस्ते पूजाअर्चा करून श्रीराम जन्मोत्सव, पाळणा व महाआरती केली जाते. त्यानंतर दुपारी श्रीराम मंदिर येथून भव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने काढली जाते. यात श्रीरामकाळातील विविध झाकी, भजनी मंडळ, वारकरी मंडळे सहभागी होत असतात. यावेळी संपूर्ण दिग्रस शहर रामनामाच्या गजराने दुमदुमून जाते.

याच मंदिरात झाल्यात स्वातंत्र्याच्या जनजागृती सभा

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, लोकनायक बापूजी अणे, डॉ. हेडगेवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच गाडगे महाराजांनी बाबासाहेब परांजपे यांच्यासोबत भारताच्या स्वातंत्र्याच्या जनजागृतीसाठी याच मंदिरात सभा घेतल्या होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्!या थोर महापुरूष स्वातंत्र्यसेनानींचे वास्तव्य याच मंदिरात लाभल्याने याची स्मृती म्हणून मंदिरासमोरील जागेत १९९५ मध्ये सुधाकर बळीराम हरसुलकर यांनी भारतमाता स्मृती सभागृह बांधले. भारतमातेचे १०५ सुपुत्र या स्वातंत्र्यवीरांची सचित्र माहिती असलेल्या पुस्तकाची येथे दररोज पुष्पहार अर्पण करून पूजा केली जाते. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मंदिरास भाविकांनी एक वेळ नक्कीच भेट द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT