villagers successfully control fire in gondpipari of chandrapur 
विदर्भ

माणुसकीचे असेही दर्शन, आग लागताच गाव आले धावून अन् तलावातील पाण्यानी विझविली आग

संदीप रायपुरे

गोंडपिपरी ( जि. चंद्रपूर ) :  गावातील एका शेतकऱ्याच्या धानाच्या पुंजण्याला वेडसर महिलेने आग लावली. क्षणार्धात आगीचा भडका उडाला. ही माहिती गावभर पसरली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना आगीची बातमी समजली. काही वेळात पोलिस घटनास्थळी पोहोलचे. अग्निशमन वाहनाची वाट बघणे शक्‍य नव्हते. यामुळे पोलिस व गावकऱ्यांनी गावाच्या तलावापासून तर घटनास्थळापर्यंत मानवी साखळी तयार केली अन्‌ यातून आग विझविली. शुक्रवारी (ता. 20) सकाळच्या सुमारास तालुक्‍यातील कोंढाणा शेतशिवारात हा प्रसंग बघायला मिळाला.

धाब्यालगत कोंढाणा येथील राजू येनमपल्लीवार यांची दीड एकर शेती आहे. या शेतात धानकापणी केल्यानंतर त्यांनी शेतातच धानाचे पुंजणे ठेवले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका वेडसर महिलेने त्यांच्या पुंजण्याला आग लावली. आगीचा भडका उडाल्याने गावकऱ्यांनी धावाधाव केली. धाब्याचे ठाणेदार सुशील धोपटे हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांची चमू व गावातील नागरिकांनी एक साखळी तयार केली. या माध्यमातून तलावाच्या पाण्याने आग विझविण्यात आली. यात येनमपल्लीवार यांचा धानाचा ढिगारा जळून खाक झाला. मात्र, लगतच्या शेतकऱ्याचा ढिगारा वाचविण्यात यश आले.

गोंडपिपरीचे तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस व नागरिकांच्या सहकार्याने पुढील अनर्थ टळल्याने तहसीलदार मेश्राम यांनी पोलिस व नागरिकांच्या भूमिकेचे कौतुक केले. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला.

पेट्रोलिंगवर असताना कोंढाण्यात धानाच्या पुंजणाला आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. अग्निशामक वाहनाला विलंब असल्याने आम्ही नागरिकांच्या मदतीने साखळी तयार केली व आग विझविली.
- सुशील धोपटे, ठाणेदार, धाबा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT