Wardha Accident
Wardha Accident Wardha Accident
विदर्भ

पुलाखाली रक्त अन् मांसाचा सडा; वाहनाचे मीटर १६० वर लॉक

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : सावंगी (मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यवतमाळ-नागपूर मार्गाने परत येत असताना देवळी लगतच्या सेलसुरा येथे भरधाव वाहन पुलाच्या संरक्षक भिंतीवर धडले. वाहन भिंतीवर धडकताच सातही युवक वाहनातून फेकले गेले. वाहनातून फेकले गेलेले युवक थेट पुलाच्या खाली असलेल्या दगडांवर आदळले. यात सातही जणांचा मृत्यू झाला. यावेळी पुलाच्या खाली अक्षरशः रक्ताचा आणि मांसाचा पडलेला सडा अंगाचा थरकाप उडविणारा होता.

अपघाताची माहिती मिळताच सांवगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत विद्यार्थ्यांची ओळख पटताच शिकत असलेल्या महाविद्यालयाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघाताची भीषणता बघता पोलिस प्रशासनही स्तब्धच होते. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात रवाना केले. यानंतर वाहन बाहेर काढून तपासणी करण्यात आली.

पहाटेपर्यंत बचाव कार्य चालले. अपघात घडल्याची माहिती मिळताच पोलिस प्रशासना बरोबर फॉरेन्सिक एक्स्पर्टकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी सावंगी रुग्णालयाचे सुरक्षा अधिकारी विजय खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ इंच सिमेंट कॉंक्रिटची भिंत ढासळली

भदाडी नदी पुलावर दोन पुलांच्यामध्ये अपघाचा धोका लक्षात घेता १२ इंच सिमेंट कॉंक्रिटची भींत बाधण्यात आली आहे. या भीषण अपघातात ही सुरक्षा भींत पूर्णतः ढासळली. तसेच भिंतीच्या सळाखी उघड्या पडल्या आहे.

वाहनाचे मीटर १६० वर लॉक

भरधाव निघालेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वाहनाची गती नेमकी किती हे कळायला मार्ग नाही. परंतु, अपघातग्रस्त वाहनाचे गती दर्शवणारे मीटर १६० वर लॉक झाले होते. घटना स्थळाच्या शंभर मीटर आधी रस्त्यावर टायर घासल्याची चिन्ह असल्याने नेकमी वाहनाची गती किती हा प्रश्न कायम आहे.

एअरबॅग फुटून रस्त्यावर

वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून चालक तसेच चालकांच्या शेजारी बसणाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एअर बॅग लावण्यात येतात. या अपघातात एअरबॅग खुलल्या. परंतु, त्यांचाही लाभ झाला नाही. या बॅग फुटून रस्त्यावर पडल्याचे (Vehicle crash) दिसले.

विद्यार्थ्यांच्या अपघाताची घटना ही मनाला चटका लावणारी आहे. सगळेच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असल्यामुळे ते देशाचे भविष्य होते. या अपघातामुळे एक पालक म्हणून माझे मन खिन्न झाले आहे. परमेश्वर विद्यार्थ्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
- सुनील केदार, पालकमंत्री

वैद्यकीय महाविद्यालयाने स्वीकारले मृतांचे पालकत्व

अपघातातील सातही मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याची माहिती सावंगी येथील वैद्यकीय रुग्णालयात मिळताच रुग्णालय परिसरात चांगलीच गर्दी करण्यात आली होती. अपघातात मृत विद्यार्थी परराज्यातील असल्याने त्यांचे पालक वर्ध्यात दाखल होण्यास किमान १२ तासांचा वेळ लागणार आहे. तोपर्यंत शवविच्छेदन ताटकळत ठेवणे शक्य नसल्याने महाविद्यालय प्रशासनाने शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांना लेखी अर्ज करीत पालकांची जबाबदारी स्वीकारली आहे. एकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह रवाना करण्यात आला. याव्यतिरिक्त मृत सहा विद्यार्थ्याचे शव विच्छेदन करून सावंगी येथील शवागारात ठेवण्यात येणार आहे. त्यांचे पालक आल्यानंतर मृतदेह स्वाधिन करण्यात येणार आहे.

अपघाताची माहिती मिळाली. यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यात तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचे निधन झाले. ही घटना अंगाचा थरकार उडविणारी आहे.
- रामदास तडस, खासदार

बांधकामातील त्रुट्या ठरल्या अपघातास कारण

नागपूर-वर्धा-यवतमाळ चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात अनेक तृट्या आहेत. यातूनच सेलसुरा येथील भदाडी नदीजवळ अपघात झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. बांधकाम करताना रस्ता सरळ केला नाही. पूर्वी जसे रस्त्याचे वळण होते तेच कायम ठेवून चौपदरीकरण करण्यात आले. यामुळे सेलसुरा गावाजवळील पुलावरून गाडी वर्धेकडे येते तेव्हा वाहनांचा वेग वाढतो. वळण घेऊन वाहन पुलाकडे येत असताना नियंत्रण ठेवून वाहन वळण घेऊन चालवणे आवश्यक असते. अशावेळी थोडे जरी दुर्लक्ष झाले तर वाहन पुलाच्या कठड्यावर जाऊ शकते. या अपघातात असेच काही झाले असावे, असा कयास लावण्यात येत आहे. वळण घेताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचे लाईट सरळ चालकाच्या डोळ्यावर येते आणि चालकाचे नियंत्रण बिघडते. यावर उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. दोन्ही पुलाच्या मध्यभागी असलेली भिंतीला रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. तिथे तेही रिफ्लेक्टर नव्हते. यामुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT