file photo 
विदर्भ

गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतापर्यंत पोहोचेना 

सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर (भंडारा) : विदर्भातील महत्त्वाकांक्षी व शेतकऱ्यांना सुजलाम्‌-सुफलाम्‌ करणाऱ्या तसेच राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. डाव्या कालव्याचे काम पूर्णत्वास आले असले तरी कालवा व वितरिकेचे काम अर्धवट आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. परिणामी, शेतकरी सिंचनापासून वंचित असून दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहेत. 

धरणाची किंमत 14,999 कोटी रुपयांवर

पूर्व विदर्भातील सिंचनाची सोय व्हावी, यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या बांधकामाचे भूमिपूजन 1988 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रकल्पासाठी 372 कोटी रुपये एवढा निधी मंजूर होता. मात्र, धरणाचे काम पूर्ण न झाल्याने मागील वर्षी धरणाची किंमत 14,999 कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. यावरून सरकार व लोकप्रतिनिधी कितपत सकारात्मक आहे? असा प्रश्‍न भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे. धरणाचा डावा कालवा हा 42किलोमीटर तर उजवा कालवा हा 110 किलोमीटर अंतराचा आहे. प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, डावा कालव्याचे काम अजूनही पूर्णत्वास आलेले नाही. मागील तीन महिन्यांपूर्वी पावसाचे दिवस असताना सप्टेंबर 2016 ला लाखांदूर तालुक्‍यातील मोहरणा, खैरणा, दोनाड, नांदेड, इटान व इतर गावांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकारी अभियंता (गोसेखुर्द) यांना निवेदने देण्यात आली. 

फायदा शेतकऱ्यांना नाही

निवेदनामध्ये धानउत्पादक शेतकऱ्यांना या भागातून गेलेल्या डाव्या कालव्याचे पाणी हे शेतात न जाता ते सरळ चुलबंद नदीला जाते. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यासाठी उपाययोजना म्हणून वितरिकेचे काम करावे. 5,700 मीटर अंतरावर एवढी त्या गेटची सुविधा पाहिजेत, अशी मागणी केली होती. तत्कालीन आमदार बाळा काशिवार यांच्याकडेही मागणी केली होती. मात्र, केवळ आश्‍वासनच मिळाले. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने त्वरित कालवा व वितरिकेचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. 

गोसेखुर्द प्रकल्पामुळे वैनगंगा दूषित 

गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला पोहोचते. वैनगंगेवर लाखांदूर व पवनी तालुक्‍यांतील अनेक गावातील नळयोजना आहेत. नागपूर येथील नागनदीचे पाणी गोसेखुर्द प्रकल्पासह वैनगंगेला मिसळते. यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT