well overflow while digging bore well in rawanwadi of gondia 
विदर्भ

ऐकावे ते नवलच! खोदकाम बोरवेलचे अन् पाणी निघाले विहिरीतून

महेश येडे

रावणवाडी ( जि. गोंदिया ) : शेतकरी आपल्या शेतात बोरवेलचे खोदकाम करीत होते. याचवेळी अंदाजे 30 फूट दूर अंतरावरील अरुण हरिणखेडे यांच्या घरी असलेल्या विहिरीतून गढूळ अन्‌ थंडगार पाण्याचा प्रवाह वाहू लागला. पाहता पाहता संपूर्ण घर जलमय झाले. या घटनेची वार्ता कानोकानी पडताच हे दृश्‍य पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.   

येथील शेतकरी झाडूलाल बिसेन हे शनिवारी आपल्या मालकीच्या शेतात बोरवेलचे खोदकाम करीत होते. त्यांच्या शेतापासून अंदाजे 30 फुट दूर अंतरावर अरुण हरिणखेडे यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या आवारात विहीर आहे. दरम्यान, बोरवेलचे खोदकाम सुरू असताना जमिनीचा एक हिस्सा खचला. पाहता पाहता, विहीर ओव्हरफ्लो झाली. विहिरीतून फवारे निघू लागले. गढूळ अन्‌ थंडगार असलेल्या पाण्याने हरिणखेडे यांचे संपूर्ण घर व्यापून टाकले. त्यामुळे घरातील दैनंदिन साहित्यांचे मोठे नुकसान झाले.

अचानक घडलेल्या घटनेने हरिणखेडे यांच्यासह अन्य नागरिकदेखील अचंबित झाले. हा काय प्रकार असावा, म्हणून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. कोणी भीतीयुक्त वातावरणात वावरत होते. रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने भयभीत झालेल्या अरुण हरिणखेडे यांना गावातीलच आपल्या नातेवाइकांकडे रात्रभर मुक्काम ठोकावा लागला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून शेतकरी झाडूलाल बिसेन यांनी बोरवेल खोदकाम बंद केले असून, या घटनेची आज दिवसभर परिसरात चर्चा होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT