Womens gold chain thief in Amravati 
विदर्भ

दुचाकीस्वारांचा चेहरा कपड्याने झाकलेला, शिवाय नंबरप्लेट कोरी; सोनसाखळी हिसकावल्यानंतर महिला घाबरली

संतोष ताकपिरे

अमरावती : दिवाळीच्या सुट्यांमध्ये आपल्या बहिणीकडे आलेली महिला फोनवर बोलत असताना दुचाकीस्वारांनी तिची सव्वा लाखांची सोनसाखळी हिसकावली.

गुरुवारी (ता. २६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास गाडगेनगरहद्दीत समता कॉलनी परिसरात ही घटना घडली. मनीषा बुंदे (रा. कवठा बाजार) ही महिला समता कॉलनीत राहणाऱ्या बहिणीच्या घरी आली. दुपारी घरासमोरच मोबाईलवर बऱ्याच वेळेपर्यंत बोलत होत्या. दुचाकीवर असलेल्या दोघांनी हीच बाब हेरली. महिलेच्या जवळ जाऊन बेसावध असल्याचे बघून ३० ग्रॅमची एक लाख २५ हजारांची सोनसाखळी जबरीने हिसकावून पळ काढला.

दुचाकीस्वारांनी कपड्याने स्वत:चा चेहरा झाकला होता. शिवाय दुचाकीची नंबरप्लेट कोरी होती. त्यामुळे सोनसाखळी हिसकावल्यानंतर महिला घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत चेनस्नॅचर तेथून फरार झाले. मनीषा बुंदे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गाडगेनगर पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात नाकाबंदी केली. सराईतांची चौकशी आरंभिली. परंतु, दुचाकीस्वाराचा शोध लागू शकला नाही.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

घटनेनंतर पोलिसांनी समता कॉलनीतील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका दुचाकीवर दोघे युवक जाताना दिसले. परंतु, चेहरा झाकलेला असल्याने तसेच नंबरप्लेटही कोरी असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT