वर्धा : नाव प्रफुल्ल मोते... राहणार वायगाव (निपाणी)... चार ते पाच वर्षांपूर्वी प्रफुल्लने मोठी हिंमत करून शेतीवर तब्बल बारा लाखांचे कर्ज घेतले. या कर्जातून पोल्टी फार्मचा व्यवसाय सुरू केला. यासाठी शेतातील सहा हजार फूट जागेत मोठे शेडही उभारले. या व्यवसायातून महिन्याकाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळत होता. शिवाय त्याने चार युवकांना रोजगारसुद्धा दिला होता. सर्वकाही सुरळीत सुरू असताना "करोना'च्या व्यवसायाला ग्रहण लागले आणि होत्याचे नव्हते झाले. "करोना'च्या अफेवेने चक्क व्यवसायच बंद करण्याची वेळ प्रफुल्लवर आली अन् त्याच्यासह चोघांचा रोजगार हिरावला गेला.
सद्या देशात "करोना'ने हाहाकार माजविला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांना "करोना'मुळे आपला जिवही गमवावा लागला आहे. अनेकांनी बाहेर फिरायलाही जाणेसुद्धा टाळले आहे. जगभरात या संसर्गजन्य रोगाबद्दल भीती निर्माण झाली असतानाच याचे अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. सर्वत्र "करोना'ची चर्चा सुरू असताना कोंबड्यांमधून "करोना' व्हायरसची लागण होत असल्याची अफवा पसरवली जात आहे. या अफवेमुळे सर्वसामान्यांनी चांगलीच धडकी घेतली आहे. या अफवेचा मोठा परिणाम कोंबडी विक्रेत्यांवर झाला आहे.
"करोना' व्हायरसची लागण कोंबड्यांना झाल्याच्या अफवेमुळे बाजारात कोंबड्यांना मागणी नाही. व्यापारी 20 ते 25 रुपये किलोने कोंबड्या मागत आहे. सध्या स्थितीत संपूर्ण शेडच रिकामे पडले आहेत. प्रफुल्ल मोते या व्यावसायिकाकडे चार युवक कामाला होते. मात्र, "करोना'च्या अफवेमुळे त्यांचा रोजगारपासून मुकावे लागले आहे. सोशल मीडियावरून पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय बंद झाल्यातच जमा आहे. या अफवेमुळे प्रफुल्ल यांच्यासह चार जण बेरोजगार झाले आहेत.
होळीचा सण आठ ते दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळांत खवय्यांकडून मांसाहार करण्याला प्राधान्य दिले जाते. या काळात पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना घडीची फुरसत नसते. परंतु, अफवेमुळे हा व्यवसाय करणाऱ्यांवर सध्या रिकामे राहण्याची वेळ आली आहे. "करोना'च्या अफवेमुळे अनेकांनी चिकन खाणे बंद केले आहे. परिणामी पोल्ट्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर सध्या बेरोजगार होण्याची वेळ आल्याचे दिसत आहे.
पोल्ट्री फार्मचा व्यावसाय सुरू करण्यासाठी प्रफुल्ल मोते याने वडिलोपार्जित शेतीवर तब्बल बारा लाखांचे कर्ज घेतले. या कर्जाचा बोझा अद्याप सातबारावर आहे. हा भाग कर्जमाफीत बसत नसल्याने त्यांना इतर योजनांचा लाभ मिळत नाही. आता हा व्यवसाय डबघाईस आल्याचे चित्र असताना हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तो सापडला आहे.
बॅंकेचे हप्ते कसे फेडू?
पोल्ट्री फार्मचा व्यवसाय शेतीला पूरक आहे. शेतीवर कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करून चार ते पाच वर्षे झालेत. व्यवसायातून महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये निव्वळ नफा मिळत होता. मात्र, करोना व्हायरस कोंबड्यांना झाल्याच्या अफवेमुळे कोंबड्यांना मागणी नाही. बॅंकेचे हप्ते कसे फेडावे, असा प्रश्न पडला आहे.
- प्रफुल्ल मोते,
पोल्ट्री फार्मचा मालक, वायगाव (निपाणी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.