Fact Check Haldhar Nag Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: साहेब दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत...'पद्मश्री' पोस्टाने पाठवा; नाग हलधर यांच्याबाबतचा दावा खोटा

Haldhar Nag : ओडिशातील हलधर नाग या अवलियाची कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी,नवलाईची बाब म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे.

आशुतोष मसगौंडे

मूळचे ओडिशाचे, असलेले हलधर नाग हे ‘कोसली’ भाषेतील प्रसिद्ध लोककवी आहेत. 1950 मध्ये ओडिशाच्या बरगढ जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या, हलधर नाग 10 वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडीलांचे निधन झाले. त्यांना तिसरीमध्ये असताना शिक्षण सोडावे लागले.

तरीही हलधर नाग यांनी कोसली भाषेत असंख्य कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे. यासाठी त्यांना केंद्र सरकारने 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

दरम्यान, एका एक्स युजरने एक्सवर पोस्ट करत दावा केला आहे की, पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला दिल्लीला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैस नव्हते. त्यामुळे हलधर नाग यांनी पद्मश्री पुरस्कार पोस्टाने पाठवण्याची विनंती केली होती.

दावा

एका एक्स युजरने पोस्ट करत म्हटले आहे की, "साहे, दिल्लीला येण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, कृपया माझा पुरस्कार पोस्टाने पाठवा." हे शब्द आहेत पद्मश्री पुरस्कार विजेते हलधर नाग यांचे.

या पोस्टमध्ये युजर पुढे म्हणतो, "कधीही 'श्री' म्हणून संबोधित न झालेल्या हलधर नाग यांच्याकडे फक्त तीन जोड कपडे, एक तुटलेली रबरी चप्पल, एक जोडी रिमलेस चष्मा आणि 732 रुपयांची बचत आहे. आता त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे."

"तुम्ही या विलक्षण व्यक्तीला सन्मान करा. त्यांच्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल पद्मश्री निवड समितीचे कौतुक."

'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

हलधर नाग यांच्याबद्दल दावा करणारी एक्स पोस्ट खाली पाहू शकता.

Fact Check Haldhar Nag

सत्य

सकाळने एक्सवर व्हयरल होत असलेल्या या पोस्टमागील सत्यता तपासली असता असे आढळले की, हलधर नाग यांच्याबाबतचा हा दावा खोटा आहे.

यामागील सत्य शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर केला. तेव्हा आम्हाला भारताचे 2012-2017 या कालावधीतील राष्ट्रपती असलेल्या प्रणव मुखर्जी यांच्या अधिकृत एक्स अकाउंटचे अर्काईव्ह सापडले.

मुखर्जी यांच्या या अकाऊंटमध्ये हलधर नाग यांना पद्मश्री पुरस्कार दिल्याची पोस्ट आहे. यावरून स्पष्ट होते की, हलधर नाग यांच्याबाबत केला जात असलेला दावा खोटा आहे.

निष्कर्ष

हलधर नाग यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास दिल्लीला जाण्यासाठी पैसे नसल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट खोट्या आहे. आम्ही केलेल्या तपासात समोर आले आहे की, नाग यांनी असा कोणताही दावा केलेला नव्हता. त्यांनी 28 मार्च 2016 मध्ये त्यावेळचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon :खडसेंच्या घरात चोरी! ५ तोळं सोनं आणि ३५ हजार लंपास; एकनाथ खडसे म्हणाले, जळगावात पोलिसांचा धाक राहिला नाही

Latest Marathi News Live Update : १ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी

Ranji Trophy 2025: पावसाच्या व्यत्ययात मुंबई संघाची कसरत; छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात आघाडीसाठी आता चार विकेटची गरज

UP Encounter: योगींच्या पोलिसांनी एका शहरात केले डबल एनकाऊंटर! तिघांच्या पायाला गोळी; गुन्हेगारीचा मोठा इतिहास!

Arjun Tendulkar: 4,4,4,4,4,4,6! अर्जुनच्या फटकेबाजीमुळे गोवा संघाचा कमबॅक; आधी ३ विकेट्स घेऊन कर्नाटकला दिलेले धक्के...

SCROLL FOR NEXT