Gold-chain-thief 
व्हायरल-सत्य

Viral Satya : सोनसाखळी चोरांना महिलेनं दाखवला इंगा (Video)

सकाळ वृत्तसेवा

एक महिला आणि तिची मुलगी सायकल रिक्षामधून उतरून घरी चालली होती. त्याचवेळी दोघे सोनसाखळी चोर बाईकवरून आले. महिलेच्या जवळ येताच बाईकचा वेग कमी केला आणि काय केलं पाहा. बाईकवर मागे बसलेल्या चोरानं महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. सोनसाखळी ओढत असताना महिलेनं प्रसांगवधान दाखवल्यानं तिनं चोराचा हात पकडला  आणि या चोराला बाईकवरून खाली पाडलं. चोराला पकडून ठेवल्यानं आजूबाजूचे लोकही जमा झाले. बघा, या चोराला या महिलेनं पकडून ठेवलं. पण, आपलंही काय खरं नाही म्हटल्यावर त्याचा साथीदार बाईक सोडून पळत होता. मात्र, या चोरालाही लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला.

या दोन्ही चोरांना लोकांनी पकडून पकडून मारलं. जमावानं दोघांना बेदम चोप दिला. पुन्हा चोरी करताना हे दोघेही 100 वेळा विचार करतील अशीच शिक्षा या लोकांनी दिली. हे दोघेही चोर सराईत आहेत, चोरी करताना आपली ओळख कळू नये म्हणून डोक्यात हेल्मेट घातलंय. पण, महिलेच्या धाडसामुळं यांचा चोरीचा प्लॅन फसला आणि दोघेही लटकले. ही धक्कादायक घटना मागील महिन्यात घडलीय. पण, आता हा व्हिडीओ व्हायरल करून सोनसाखळी चोरांपासून सतर्क राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. त्यामुळं अशा सोनसाखळी चोरांपासून सावधगिरी बाळगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT