Menstrual Stigma esakal
वुमेन्स-कॉर्नर

Menstrual Stigma : 21 व्या शतकातही लाखो मुलींना Periodsमुळे सोडावी लागते शाळा

पाळी कलंक समजून आजही भारतातल्या लाखो मुलींची शाळा सुटत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lack of Menstrual Hygiene : सुरक्षा, विज्ञान, तंत्रज्ञांन सगळ्याच क्षेत्रात देश प्रगती करत आहे. दर वर्षी १०-१२ वी, स्पर्धा परिक्षा यात मुलींच पहिल्या आल्याच्या बातम्या आपण कायम वचतो. पण ही संख्या किती असा प्रश्न पडावा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भारतातल्या लाखो मुलींना Periods मुळे शाळा सोडण्याची वेळ येत आहे. पाळी या एका गोष्टीभोवती भारतीय समाजात अनेक समज गैरसमज आहेत. त्यामुळे मुली वयात आल्या की, त्यांची शाळा सोडली जाते. आजच्या २१ व्या शतकातही हे प्रणाम लाखांच्या घरात आहे.

भारतातल्या काही भागात आजही सामाजिक दबाव, पाळी विषयीचे वैज्ञानिक शास्त्र माहिती नसणे, या काळातील स्वच्छतेविषयीचे अज्ञान आणि दर महिन्याला त्यांच्या मासिक पाळीच्या कालावधीसाठी शाळांमध्ये बहिष्कृत केले जाते.

ही प्रथा भारताच्या ग्रामीण भागातील मोठ्या भागात पाळली जात आहे. तिथे शालेय वयाच्या मुलींमध्ये मासिक पाळी स्वच्छतेबद्दल जागरूकता आणि ज्ञानाचा अभाव आहे.

याविषयी झालेल्या अभ्यासातून समोर आलेले निकर्ष

याविषयी UNICEF ने केलेल्या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार भारतातल्या 71% किशोरवयीन मुलींना पहिली पाळी येईपर्यंत त्याविषयी काहीही माहित नसते. त्यामुळे जेंव्हा पाळी सुरू होते तेंव्हा शाळा सोडण्याचं प्रमाण वाढतं.

2019 मध्ये प्रसिध्द झालेल्या एका NGOच्या रिपोर्टनुसार मासिकपाळी स्वच्छतेची सुविधा नसणे, सॅनिटरी पॅड्सची सुविधा नसल्याने दर वर्षी २३ लाख मुली शाळा सोडतात.

हे प्रमाण दुर्गम ग्रामीण भागात असल्याने इथे स्वच्छतागृहांचा अभाव, स्वच्छ पाणी नाही शिवाय मासिक पाळी संदर्भात गैरसमज, त्रास, निषिध्द समजणे यामुळे मुली शाळा सोडत असल्याचं अजून एका सर्वेक्षणातून समोर आले.

  • पहिली पाळी येण्याआधी त्याविषयी कसलीही माहिती नसल्याने पाळी सुरू झाल्यावर त्याविषयी मुलींच्या मनात भीती निर्माण होते.

  • भावनिक आणि मानसिक तणावाबरोबरच सॅनिटरी पॅड्स पकडणे, त्यांची विल्हेवाट लावणे आणि स्वतःला कोरडे व स्वच्छ ठेवणे हे मोठे आव्हान आहे, ज्याचा विशेषतः शालेय वयातील किशोरवयीन मुलांवर परिणाम होतो.

  • अनेक गरिब कुटुंबांना कामासाठी स्थलांतर करावं लागत. तर बऱ्याच मुली दुर्गम भागात राहतात. अशावेळी त्यांच्यापर्यंत सॅनिटरी पॅड्स आणि तत्सम उत्पादन पोहचू शकत नाही. किंवा ते घेण्या एवढी त्यांची आर्थिक क्षमता नसते.

  • मासिक पाळी विषयी बोलणे निषिध्द समजले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT