युथ्स-कॉर्नर

YIN च्या श्रीगोंद्यातील विद्यार्थी-संशोधकांचा राष्ट्रीय स्तरावर डंका

नितीन धांडे-पाटील

श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील संशोधक विद्यार्थ्यांनी टाकाऊ केळीच्या सालीपासून सेंद्रिय शू पॉलिश तयार करणाऱ्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट नवकल्पना म्हणून निवड झाली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील संशोधक विद्यार्थ्यांनी टाकाऊ केळीच्या सालीपासून सेंद्रिय शू पॉलिश तयार करणाऱ्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट नवकल्पना म्हणून निवड झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथील निखिल संजय मगर व लोणी व्यंकनाथ येथील ऋषिकेश अशोक लबडे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केळीच्या सालीपासून सेंद्रिय शू-पॉलिश विकसित केली .हे दोघे शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे विद्यार्थी असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर सादरकरण्यात आला होता. या प्रकल्पाची केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे उत्कृष्ट नवकल्पना म्हणून निवड करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर आणि सेंटर फॉर इनोवेशन, इन्कुबॅशन अँड लिंकेजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांच्या प्रोत्साहानातून हा प्रकल्प राष्ट्रीय स्पर्धेत सादर करण्यात आला होता असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी . मोहीते यांनी सांगितले . ते म्हणाले राष्ट्रीय स्तरावर सहभागी नऊ हजारपेक्षा जास्त प्रकल्पांपैकी १२७ प्रकल्पांची निवड करण्यात आली. त्यात आमच्या महाविद्यालयाच्या या संशोधन प्रकल्पाचा सहभाग आहे .

प्रा. नारायण घनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तयार केला आहे .महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल ,शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा आणि सचिव नंदकुमार निकम यांनी संशोधनासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या . या यशाबद्दल सर्वत्र या संशोधक विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे .

शू-पॉलिशची वैशिष्टय

  • कोणत्याही औद्योगिक रसायनांचा वापर नाही

  • केळीच्या सालींच्या विल्हेवाटीतून सेंद्रिय शू-पॉलीश तयार करण्यात येणार

  • पन्नास ग्रॅमसाठी चार रुपये उत्पादन खर्च; बाजारातील शू-पॉलिशसाठी २५ रुपयांच्या आसपास खर्च

  • पॉलिशनंतर चार दिवस चमकदारपणा राहतो

संशोधनाचे फायदे

  • केळीशी निगडित एक नवीन प्रक्रिया उद्योग तयार होणार

  • बाजारातील शू-पॉलिशमधील रसायनांमुळे कर्करोगाची शक्यता, यासाठी सेंद्रिय शू-पॉलिश चांगला पर्याय

  • कोणतेही दुष्परिणाम नाहीत

असे आहे सेंद्रिय शू-पॉलिश

  • केळीच्या सालीतील पोटशियम मिळविण्यात आले

  • त्यात ग्लिसरीन, मीठ, गेरू, काळे अबीर आदी पदार्थ मिसळविण्यात आले

  • यातूनच काळे आणि तपकिरी रंगाचेशूपॉलिश तयार करण्यात आले

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाच्या क्षमता असतात. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ग्रामीण भागातील गरजा ओळखून, त्याला पूरक संशोधन करणे गरजेचे आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असं चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयचे (शिरुर) प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते म्हणाले.

केळीच्या सालीपासून सेंद्रिय शू-पॉलिश

महाविद्यालय स्तरावरील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांना आवश्यक सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यापीठ देते. विद्यापीठ स्तरावर निवड झालेल्या अशा नवकल्पनांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्थाही केली जाते.अशा प्रकल्पांतून महाविद्यालयांमध्ये नवउद्योजक घडावेत हा एक प्रयत्न आहे, असं सीआयआयएलच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या.

आमच्या प्रकल्पाचं रोपटं श्रीगोंद्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील डॉ .योगेश अहिरे यांच्या मार्गदर्शनात रुजल व त्याला वटवृक्षात रूपांतर करायचं काम चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालातील डॉ .नारायण घनगावकर सरांनी केलं .प्राचार्य डॉ .के .सी .मोहिते सरांनी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या .परिस्थिती गरीब असल्यामुळे प्रकल्पाला लागणारी आर्थिक मदत आमचे मार्गदर्शक घनगावकर सर यांनी केली, असं संशोधक विद्यार्थी निखिल मगर आणि ऋषिकेश लबडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT