Sindhudurg Politics : राज्याच्या मंत्रिपदावर असलेल्या भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील बेरोजगारांना चांगले मार्गदर्शन करण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे प्रवृत्त करण्याची भाषण केली आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.
याबाबत त्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिले आहे. गोगावले यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन छेडू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी आज येथे दिला. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश मोरे, बँकेचे संचालक मेघनाथ धुरी, बाळू मेस्त्री, अनिल डेगवेकर आदी उपस्थित होते.
श्री. शेख म्हणाले, ‘‘शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये गोगावले यांनी खासदार नारायण राणेंविरोधात खळबळजनक वक्तव्य केले. शांतताप्रिय असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे वक्तव्य करून त्यांना नेमके काय साधायचे होते? राणेंबाबत त्यांना काही माहित असेल तर ते पोलिसांना का सांगत नाहीत? ही गंभीर बाब आहे. व्यासपीठावर असलेल्या एकाही व्यक्तीने काही न बोलता केवळ त्यांचे ऐकत रहाणे ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. जबाबदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने अशी वक्तव्य करणे हे निंदनीय आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
राणे यांनी जे गुन्हे केले, ते गोगावले यांना माहीत असताना, त्यांनी का लपवले? हा खरा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना मारामारी करून राजकीय उंची वाढवण्यात सांगणे हे कितपत योग्य आहे. खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी आहे, उच्च शिक्षण नाही. यावर मार्गदर्शन करण्यापेक्षा उघड उघड गुन्हेगारीकडे वळवले जात आहे.’’
अशांतता पसरवण्याचा प्रकार
सिंधुदुर्ग हा बॅ. नाथ पै, केशवराव राणे, सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव अशा नेत्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे वक्तव्य करून अशांतता पसरवण्याचा हा प्रकार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या राज्यात वरच्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यामध्ये अशी असंस्कृत भाषा शोभनीय नाही. गोगावले यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास आम्ही जिल्ह्यात आंदोलन उभारू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.