Zeba Shaikh's Fashion Tips
Sakal
झेबा शेख
classy look : मी शक्यतो वेस्टर्न आउटफिट्स जास्त घालते; पण प्रवास असेल, शूट असेल तर लूज टीशर्ट, ट्रॅक पॅन्ट, कॉड सेटमध्ये मी जास्त कंफर्टेबल असते. मी खूप ‘जिमहोलिक’ असल्यामुळे मी शरीराची काळजी यासाठीही घेते, की शरीर सुडौल राहिलं पाहिजे. जेणेकरून मला जे आवडतात ते कपडे मी घालू शकते. कपडे आक्षेपार्ह न दिसता बोल्ड आणि क्लासी दिसावेत याची मी काळजी घेते.
मला कंगना राणावत करत असलेली फॅशन खूप आवडते. मला तिचा एअरपोर्ट लूकही खूप आवडतो. शक्यतो मी कोणाची कॉपी करत नाही- कारण माझ्याजवळच्या लोकांचं म्हणणं आहे, की माझा फॅशन सेन्स चांगला आहे.
त्यामुळे मी शक्यतो कामाला शोभतील, असे कपडे परिधान करणं पसंत करते. मीटिंगला जायचं असेल, तर मी फॉर्मल घालते. सणासुदीला किंवा सेलिब्रिटी गेस्ट म्हणून कुठे बोलावलं असेल, तर तिथे पारंपरिक कपडे प्राधान्याने घालते.फूटवेअर हा फॅशनचा खूप महत्त्वाचा भाग असल्यामूळ मी फॅन्सी, मला शोभतील असे आणि कंफर्टेबल फूटवेअरच घालणं पसंत करते- कारण ‘फॅशन इज ऑल अबाऊट कंफर्ट’.
माझा फॅशन फंडा असा आहे, की मला मेकअप फार आवडत नाही. अर्थात, मी ग्लॅमरच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे इथं मेकअप करणं आवश्यक असतं. भूमिकेप्रमाणे मेकअप करावा लागतो, तरीही मी नैसर्गिकदृष्ट्या माझी त्वचा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करते. मी त्वचेची नैसर्गिक घटकांचा वापर करून काळजी घेते. साध्या लूकमध्ये तुम्ही छान दिसता. साधा, नैसर्गिक; पण ‘क्लासी’ असा माझा फॅशन फंडा आहे.
वन पीस, शॉर्ट ड्रेस, ट्रॅडिशनल, डेनिम, साडी, स्कर्ट हे सर्व आऊटफिट्स मला आवडतात. या सर्व आउटफिट्सना मी खूप आत्मविश्वासानं आणि सहजपणे कॅरी करू शकते. फॅशन करताना मला कोणता रंग छान शोभून दिसेल व मी कंफर्टेबल असेल असेच कपडे घालते आणि समोरच्या व्यक्तींना इम्प्रेस करण्यात माझा कंफर्ट मी सुटू देत नाही.
तुमच्या कपड्यांबरोबरच पादत्राणांकडेही लक्ष द्या. ते कंफर्टेबल पाहिजेत.
नको त्या ठिकाणी ‘आउट ऑफ द बॉक्स’ आउटफिट्स घालणं टाळा
मेकअप कमीत कमी असला पाहिजे.
ट्रेंड्सचा अवलंब करायला काही हरकत नाही; पण जे दुसऱ्याला छान दिसतंय ते आपल्यालाही शोभून दिसेल असं काही नाही. त्यामुळे तुमची फॅशन तुम्ही स्वतः करा. ॲक्सेसरीजचा योग्य वापर करा. हासुद्धा फॅशनचा भाग आहे.
‘जसा देश तसा वेश’ ही म्हण कपड्यांबाबत खरंच लागू होते. तुमची ‘एलिगन्सी’ दिसली पाहिजे आणि ती आपल्या बोलण्यातून, आपल्या कपड्यांमधून दिसते.
(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.