दररोज 7 रुपये वाचवा, म्हातारपण जाईल मजेत; जाणून घ्या | Atal Pension Yojana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atal Pension Yojana | Investment tips
दररोज 7 रुपये वाचवा, म्हातारपण जाईल मजेत; जाणून घ्या | Atal Pension Yojana

दररोज 7 रुपये वाचवा, म्हातारपणीचे दिवस जातील मजेत; जाणून घ्या

Atal Pension Yojana: अटल पेन्शन योजना ही वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी सर्वोत्तम योजना आहे. या योजनेद्वारे तुम्ही कमी गुंतवणूक करूनही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.अटल पेन्शन योजनेत सहभागी होऊन पती-पत्नी दोघांनाही दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

भारतातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुमचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

पेन्शन (Pension) ही कोणत्याही माणसासाठी मोठी मदत ठरू शकते. विशेषत: वृद्धापकाळासाठी जेव्हा तुम्ही त्यासाठी गुंतवणूक (Investment) करता तेव्हा तुमचे भविष्य सुरक्षित असू शकते.

हेही वाचा: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी 2 लाख रुपये गुंतवा, मिळेल मोठा नफा

काय आहे ही पेन्शन योजना-

जर तुम्हाला तुमचे म्हातारपण सुखी करायचे असेल तर तुम्ही अटल पेन्शन योजनेत सामील होऊ शकता. ही एक सरकारी पेन्शन योजना आहे, आणि ती हमखास परतावा देते. गुंतवणुकीच्या आधारावर तुम्हाला दरमहा रु. 1000 ते रु. 5000 पर्यंत पेन्शन मिळू शकते.

वयोमर्यादा-

यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे वयाचे लोक या योजनेत सामील होऊ शकतात. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळेल.

हेही वाचा: बचत खाते सुरू करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

तुम्हाला पेन्शन किती मिळेल?

तुम्ही 18 वर्षांचे असाल, तर या योजनेत दरमहा 210 रुपये म्हणजेच दररोज 7 रुपये गुंतवून तुम्हाला दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. दुसरीकडे, वयाच्या 60 वर्षांनंतर, जर केवळ 1000 रुपये मासिक पेन्शनची आवश्यकता असेल, तर त्यासाठी 18 व्या वर्षापासून दरमहा केवळ 42 रुपये जमा करावे लागतील.

Web Title: Invest In Atal Pension Yojana For Senior Citizens

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PensionInvestment
go to top