Happy Birthday Lata Mangeshkar : कृपाप्रसाद

bela-shende
bela-shende

लता मंगेशकर यांच्याविषयी बोलणं म्हणजे कुठल्याही गायिकेसाठी लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. लता मंगेशकर हे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं काम इतकं हिमशिखराएवढं आहे. जोवर सूर्य, चंद्र, तारे आहेत, तोपर्यंत लतादीदींचा आवाज, त्यांची गाणी आपल्या कानावर पडणार आहेत. जर सरस्वतीदेवी आता असत्या आणि त्यांचा स्वर कसा असता याचा विचार केला, तर तो लतादीदींच्या आवाजासारखाच असता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी दैवी आहेत, असं मला वाटतं. लतादीदी या सरस्वतीच्या रूपात गानरसिकांना मिळालेला एक आशीर्वाद, कृपाप्रसादच आहे. 

लतादीदींचं स्थान हे संपूर्ण जगात अढळ आहे. आज लतादीदींचा आवाज फक्‍त भारतातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोचलेला आहे. भारतीय चित्रपट संगीताची ओळख म्हणजे काय आहे, असं मला विचारलं, तर माझ्या मते ती आहे लतादीदींचा आवाज.  

लतादीदी या माझ्या आदर्श आहेत. अर्थात, गायन क्षेत्रातील प्रत्येक गायिकेच्या आदर्श असतीलच असं मला वाटतं. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून आणि प्रत्येक कलाकृतीतून बरंच काही शिकण्यासारखं आहे. लतादीदींनी गायलेली अनेक गाणी माझी आवडती आहेत. मदनमोहन, आर. डी. बर्मन, नौशादजी यांच्यासोबत त्यांनी गायलेली गाणी अप्रतिमच. ‘जीया ले गयो जी मोरा सांवरियां’, ‘लग जा गले’, सिलसिला चित्रपटातील सर्वच गाणी अशी त्यांची बरीच गाणी आहेत जी मला आवडतात. त्यांचं एक गाणं हेही गाण्याचं संपूर्ण विश्‍व असल्यासारखं आहे. त्यांच्याबद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात. 

बेला शेंडे, गायिका

***************************************

***************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com