Happy Birthday Lata Mangeshkar : चमत्कारच!

वैशाली सामंत
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

लता मंगेशकरांचा सुरेल आवाज हे अजब रसायन आहे आणि त्यातून निर्माण होणारं गाणं म्हणजे चमत्कारच. खरंतर लतादीदी म्हणजे मूर्तिमंत गाणंच. मी माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तींमुळे प्रेरित आहे, त्यातील लता मंगेशकर एक आहेत. गानक्षेत्रातील त्या सरस्वतीदेवीच आहेत असं मला वाटतं. मी त्यांच्यासारखं गाऊ तर शकणार नाही; पण त्यांच्याकडून त्यांचा प्रवास, त्यांची जिद्द आणि ज्या आत्मीयतेने त्यांनी स्वतःचं करिअर घडवलं आहे, हे त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे. 

मला त्यांच्याकडून नेहमीच एक वेगळीच ऊर्जा मिळत आली आहे. स्वतःची ओळख निर्माण करणं आणि त्या ओळखीला मान मिळवून घेणं हे स्वतःचं स्वतःला जमलं पाहिजे. स्वतःच्या कामाचा अभ्यास करत पुढे जाणं हे त्याहिं वैशिष्ट्य आहे. त्या आजही आणि अजूनही त्यांच्या कामात खूपच डिटेलिंग करतात. मला अजूनही आठवतंय २०१४ मध्ये माझ्यासाठी त्यांनी गाणं गायलं होतं आणि माझ्यासाठी तो एक अमूल्य ठेवा आहे. या काळातही त्या गाण्यासाठी सतर्क बुद्धी वापरून, त्याचा अभ्यास करून आणि गाणं अगदी व्यवस्थित तयार करून आल्या होत्या. त्या खरंच माझ्यासाठी गायल्या आहेत हे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे. एक दैवी अनुभवच होता तो. एका गायकाने संगीतकाराला कसं समर्पित करावं, हे त्या वेळी त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. आपलं सर्वांचं भाग्य आहे, की आपल्याला त्या लाभल्या आहेत. लतादीदींनी स्वतःला आणि स्वतःच्या आवाजाला इतकं स्ट्राँग बनवलं, की संगीतकारांना त्यांच्या गायकीशिवाय गाणीच अपूर्ण वाटू लागली, त्यामुळेच लतादीदींसाठीच गाणी बनली. ही फार मोठी गोष्ट आहे. यासाठी त्यांनी स्वतःची मेहनत इतकी पणाला लावली, की त्या वेळी लता मंगेशकरांचा कालखंड जो सुरू झाला, तो आजही कायम आहे. 

लतादीदींची बरीच गाणी मला आवडतात. खास करून ‘आयेगा आनेवाला’, ‘मेरे ख्वाबो मे जो आये’, ‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘अनारकली’ चित्रपटातली तर सगळीच्या सगळी गाणी माझी आवडती आहेत. तसेच, त्यांची जुनी मराठी गाणीदेखील खूपच छान आहेत. ‘कळा ज्या लागल्या जीवा’ हे माझं त्यातलं सगळ्यात आवडतं गाणं.  त्यांच्या आवाजाचं एक वैशिष्ट्य म्हणजे, काळानुसार त्यांच्या आवाजातही बदल होत गेले आणि ते त्यांनी अगदी छान पद्धतीने स्वीकारून समोर आणले. त्यामुळे कोणत्याही काळातील गाण्यातली लतादीदी आपल्याला आवडते, भावते. 

- वैशाली सामंत, गायिका

***************************************

Happy Birthday Lata Mangeshkar : मस्ती... दीदीची आणि माझी

Happy Birthday Lata Mangeshkar : माझ्या दीदीचं गाणं...

Happy Birthday Lata Mangeshkar : विश्‍वकुटुंबिनी

Happy Birthday Lata Mangeshkar : एक शाश्वत स्वर

Happy Birthday Lata Mangeshkar : कृपाप्रसाद 

Happy Birthday Lata Mangeshkar : अलौकिक 

Happy Birthday Lata Mangeshkar : विद्यापीठ

***************************************

इतर ब्लॉग्स