Happy Birthday Lata Mangeshkar : विद्यापीठ

Vaishali-Mhade
Vaishali-Mhade

लतादीदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. त्यांची ख्याती आज संपूर्ण जगभर पसरली आहे हे काही नव्याने सांगायला नको. लतादीदी या गाण्याचं एक विद्यापीठच आहेत असं मी म्हणेन. त्यांच्या गाण्यातून आज लाखो गायक घडले आहेत इतकी त्यांची महती आहे.

लतादीदीच्या गायकीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे, माझे गुरुजी सुरेश वाडकरजी नेहमी सांगतात, लतादीदींचं गाणं हे नेहमी गाणं गाणाऱ्याला उत्तेजित करतं. मला त्यांच्या गाण्यातलं विशेष जाणवलं आहे ते म्हणजे, त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्यातलं टायमिंग. समेवर येण्याचं जे त्यांचं टायमिंग आहे, ते अतिशय विश्‍लेषणीय आहे. आजपर्यंत बॉलिवूडमधील कोणत्या गायकाला असं टायमिंग जमलं असेल असं वाटत नाही. लतादीदींची मला भरपूर गाणी आवडतात. लग जा गले हे त्यांचं गाणं संगीत क्षेत्रातील प्रत्येक माणसाला प्रिय आहे आणि सर्वांच्या ओठांवर रेंगाळत असतं. प्यारेलालजींसोबतची सर्व गाणी मला फार आवडतात. लता मंगेशकर यांच्या गायकीकडे प्रत्येक गायकाने विद्यार्थी म्हणून पहिलं पाहिजे. त्यांच्या गाण्यातून शिकण्यासारखं खूप काही आहे.
- वैशाली माडे, गायिका

***************************************

***************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com