Citizens protest against the medical team who came to investigate Corona misunderstanding as NRC
Citizens protest against the medical team who came to investigate Corona misunderstanding as NRC

NCR समजून कोरोनाची तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला नागरिकांनी केला विरोध 

पुणे : कोरोनाचा संशयित रुग्ण असलेल्या इमारतीमध्ये तपासणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या वैद्यकीय पथकाशी स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याची घटना घोरपडी पेठेत घडली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितल्यानंतर हा गोंधळ थांबला. दरम्यान, हा सर्व गोंधळ राष्ट्रीय नागरिक नोंदणी असल्याच्या गैरसमजातून घडल्याची माहिती पुढे आली आहे. 

ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
घोरपडी पेठेतील कोरोना झालेल्या एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आणखी कोणी आले आहे का, यादृष्टीने महापालिकेचे वैद्यकीय पथक तपासणी करीत आहे. त्यासाठी  क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ.अ. ई.सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता घोरपडे पेठेतील एका सोसायटीमध्ये गेले होते. त्यावेळी पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांचे अर्ज भरून घेत होते. त्यावेळी काही नागरिकांनी वैद्यकीय पथकाला माहिती देण्यास विरोध दर्शविला. तसेच त्यांना तेथून निघून जाण्यास बजावले. या घटनेची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०० क्रमांकावरून पोलिसांना दिली.

Fight with Corona : पोलिसाच्या मुलाचे भावनिक पत्र सोशल मिडियावर व्हायरल; एकदा वाचाच !

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पथकास पोलिस ठाण्यात जाऊन ठाणे अंमलदार  सांगण्यास सांगितले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी हा प्रकार अधिकाऱ्यांनी हा प्रकार खडक पोलिसांना सांगितला. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढून त्यांना घटनेचे गांभीर्य पटवून दिले. त्यानंतर त्यांनीही हा प्रकार गैरसमजुती न झाल्याची कबुली दिली.

"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कोरोना रुग्ण निदर्शनास आल्याने महापालिका वैद्यकीय विभागाचे एक पथक त्या त्या भागात दररोज १०० घरांची तपासणी करते. त्यानुसार आमचे एक पथक घोरपडी पेठेत तपासणी व अर्ज भरून गेले होते. त्यावेळी काही नागरिकांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी नुसार तपासणी करीत असल्याचा त्यांचा गैरसमज झाला. त्यामुळे त्यांनी विरोध केला, मात्र आम्ही त्यांना समजावले आहे. आता उद्यापासून ही सेवा सुरू होईल."
- डॉ.अ. ई.सुतार, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी.

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com