esakal | कोरोनाची लस 250 रुपयांत मिळणार ते चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा; बातम्या एका क्लिकवर

बोलून बातमी शोधा

Aaj Divasbharat}

मुंबई (Mumbai News):महाराष्ट्रात आजही वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. पण, राजीनामा अद्याप देण्यात आलेला नाही. देशात खासगी रुग्णालयांमध्ये 250 रुपयांना कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कोरोनाची लस 250 रुपयांत मिळणार ते चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा; बातम्या एका क्लिकवर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई (Mumbai News):महाराष्ट्रात आजही वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. पण, राजीनामा अद्याप देण्यात आलेला नाही. देशात खासगी रुग्णालयांमध्ये 250 रुपयांना कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचं बजेट अधिवेशन सुरू होतंय. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतलीय. कंगणा राणावत आणि हृतिक रोशन वादात आज, हृतिक मुंबई पोलिस आयुक्तलयात चौकशीला सामोरा गेला. वाचा या सविस्तर बातम्या..

खासगी रुग्णालयांमध्ये करोना प्रतिबंधक लसीसाठी २५० रुपये प्रतिडोस प्रमाणे शुल्क आकरले जाऊ शकते, अशी माहिती राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. - वाचा सविस्तर

मुंबई - विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दहा दिवस होणार आहे. - वाचा सविस्तर

मुंबई - आज मराठी भाषा दिवस. या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दादर येथील शिवाजी पार्कमध्ये स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थिती लावली. - वाचा सविस्तर

मुंबई - भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. - वाचा सविस्तर

लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे व हवाईदल प्रमुख राकेशकुमार सिंग भादोरीया हे गेले काही महिने भारतीय सैन्याच्या सीमेवरील सिद्धतेबाबत बोलत होते. - वाचा सविस्तर

मुंबई - अभिनेता ऋतिक रोशन याच्याजवळ तब्बल तीन तास मुंबई पोलिसांनी चौकशी केली. बनावट ई-मेल आयडी प्रकरणात सायबर पोलिसांनी हा गुन्हा CIU पथकाकडे वर्ग केला होता. - वाचा सविस्तर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भरचा नारा देताना देशी खेळण्यांना प्रोत्साहन मिलावं यासाठी मोठी घोषणा केली. त्यांनी देशात पहिल्यांदाच होत असलेल्या खेळण्याच्या जत्रेचं उद्घाटन केलं. - वाचा सविस्तर

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यापासून सोनं हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. राजकीय मंडळीसोबतच गडगंज संपत्ती असलेल्या बलाढ्य कुटुंबामध्येही कोण काय करेल याचा नियम राहिला नाही. - वाचा सविस्तर

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बोल्ड वक्तव्यासाठी ओळखली जाते. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सक्रीय असलेली कंगना तिच्या ट्विटमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. - वाचा सविस्तर

मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीमधील सुपर हिट चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिच्या अभिनयाचं प्रेक्षक नेहमीच कौतुक करतात. रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. - वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil