ब्रेकअपनंतर Gay तरुणाची आत्महत्या; बॉयफ्रेंडवर केले गंभीर आरोप

मृत तरूणाने सुसाईड नोटमध्ये आपल्या प्रियकरावर फसवणुक केल्याचा आरोप केलाय
Suicide case
Suicide caseसकाळ डिजिटल टीम

मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये राहणाऱ्या एका गे (Gay) तरुणाने प्रियकराने प्रेमात फसवणूक केल्यावरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पोलिसांना आत्महत्या करणाऱ्या तरुणाची एक सुसाईड नोट सापडली होती. त्यात मृत तरुणाने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. या घटनेच्या तब्बल ८० दिवसांनंतर पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केलाय. मृत तरूणाने सुसाईड नोटमध्ये आपल्या प्रियकरावर फसवणुक केल्याचा आरोप केलाय. (Gay man commits suicide after breakup with boyfriend)

Suicide case
मोदींचं 'गुजरात' जिंकण्यासाठी काँग्रेस मोठा डाव खेळणार!

मृत तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिले, "आमचे 3 वर्षे नाते होते. परंतु त्यानंतर त्याचे मन भरले आणि आपल्याला मुलीसोबत राहायचे आहे, असे तो म्हणू लागला. यापूर्वीही त्याने एका मुलीची फसवणूक केली होती. माझा बॉयफ्रेंड अनेक कारणे सांगून तीन वर्षे माझ्या घरी राहिला. यादरम्यान त्याने माझ्यावर अनेकदा शारीरिक अत्याचार केले. दोन महिने त्याने माझा छळ केला. एके रात्री माझे त्याच्याशी भांडण झाले त्यावेळी त्याने मला खूप मारले. त्याने अनेकदा नाते संपवण्याच्या धमक्या दिल्या, या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करत आहोत."

Suicide case
सरकारचा निर्णय स्तुत्य; पण कायदा रद्दच करावा; इरोम शर्मिला

बॉयफ्रेंडने माझ्याशी लग्नही केल्याचा धक्कादायक खुलासाही मृताने केलाय. एका मुलीच्या प्रेमप्रकरणात त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या व्यक्तीला कधीही सोडू नका. आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तो अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, असेही मृताने सुसाईड नोट मध्ये लिहिले.

सध्या पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com