
Video: रस्त्यावरच केले वार, मुस्लीम मुलीशी लग्न करणं हिंदू मुलाला पडलं महागात
देशात हिंदू-मुस्लीम वाद सातत्याने चिघळत असतो. या वादात अनेकदा हिंसाचे रुप धारण केले आहे. अशातच मुस्लीम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरून हिंदू मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हैदराबादमधील ही घटना आहे. बुधवारी रात्री पत्नीसह दुचाकीवरून घरी जात असताना लोखंडी रॉडने मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
हेही वाचा: Jammu-Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार
तरुणाला मुस्लीम पत्नीचा (सुलताना) भाऊ आणि नातेवाईकांनी मारहाण केली. बी नागराजू असे मृत तरुणाचे नाव आहे. नागराजू आणि सुलताना दहावीपासून एकमेकांना ओळखत होते, परंतु त्यांचे कुटुंब त्यांच्या धर्माबाहेर लग्न करण्याच्या विरोधात होते. दोघांनीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन यावर्षी 31 जानेवारीला आर्य समाजात लग्न केले.
हेही वाचा: कोलकात्यात भाजप कार्यकर्त्याची संशयास्पद हत्या, अमित शहांची CBI चौकशीची मागणी
या व्हायरल व्हिडीओत नागराजू बुधवारी रात्री पत्नीसह दुचाकीवरून घरी जात असताना लोखंडी रॉडने मारहाण करताना दिसत आहे. त्यांची पत्नी मदतीसाठी ओरडत होती, पण कोणीही तिचे ऐकले नाही. त्याला पाहताचं काही लोकांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला, त्यानंतर ते तेथून पळून गेले. तिचा पती नागराजूचा रस्त्यात सुलतानासमोर मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली असून सध्या हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Web Title: Hindu Boy Killed By Muslim Wifes Family In Hyderabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..